आंतरराष्ट्रीय

Donald Trump Threat : ‘इराणला पृथ्वीवरून नामशेष करू’, ट्रम्प यांची इराणला धमकी

'अमेरिकेची ही मोहीम इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी हालचालींपैकी एक असेल.'

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन जहाजांवर हल्ला केल्यास इराणला पृथ्वीवरून नामशेष केले जाईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली.

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या शेकडो व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकेने सोमवारी लष्करी मोहीम सुरू केली.

अमेरिकन दलांनी 50 व्यापारी जहाजांना पर्यायी मार्गाने वळवल्याचा दावा केला. इराणच्या लष्कराने इशारा दिला आहे की, सामुद्रधुनीकडे येणाऱ्या कोणत्याही अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला केला जाईल. त्यांनी एका अमेरिकन फ्रिगेटवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचाही दावा केला आहे.

‌‘फॉक्स न्यूज‌’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी अमेरिकेची ही मोहीम इतिहासातील सर्वात मोठ्या लष्करी हालचालींपैकी एक असेल. तसेच, अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा असून, गरज पडल्यास त्याचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी एप्रिलमध्येही ट्रम्प यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य करत इराणने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर इराणची पूर्ण संस्कृती नष्ट होईल, असा इशारा दिला होता.

लष्करी हालचालींना वेग

अमेरिकेने यादरम्यान आखातात तीन विमानवाहू नौका तैनात केल्या असून, हवाई इंधनपुरवठा करणारी विमाने सतत कार्यरत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी थेट लष्करी कारवाईचा पर्यायही चर्चेत होता. मात्र, अखेरीस ट्रम्प यांनी मार्गदर्शनआधारित योजना पुढे आणली.

इराणचा कडवा विरोध

इराणने या उपक्रमाला विरोध दर्शवला असून, सामुद्रधुनीवरील नियंत्रण कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही तासांतच एका व्यापारी जहाजावर हल्ल्याची घटना घडली. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT