Donald Trump दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

'तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही', डोनाल्ड ट्रम्प यांची शपथविधीपूर्वी घोषणा

Donald Trump | दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा आज (दि.20) रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 मिनिटांनी शपथविधी सोहळा होत आहे. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. अनेक परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पण पदाची शपथ घेण्यापूर्वीच ट्रम्प यांनी मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे.

यावेळी बोलताना ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा सत्तेत येण्यापूर्वी 'तिसरे महायुद्ध' थांबवण्याची प्रतिज्ञा केली आहे. ट्रम्प यांनी शपथविधीच्या एक दिवस आधी (दि.19) वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल वन अरेना येथे विजयी रॅलीला संबोधित केले. ही रॅली मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) या थीमवर आयोजित करण्यात आली होती. रॅलीमध्ये ट्रम्प यांनी काही तासांत बायडेनचे सर्व निर्णय मागे घेण्याचे आश्वासन दिले. स्थलांतराच्या मुद्द्यावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, सर्व बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या घरी परत पाठवले जाईल.

Donald Trump | बेकायदेशीर निर्वासितांना बाहेर काढणार?

ट्रम्प म्हणाले, 'आम्ही आमची मालमत्ता परत मिळवणार आहोत.' आमचे प्रशासन लवकरच देशाच्या सीमांवर पुन्हा नियंत्रण मिळवेल. यावेळी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपार योजना राबणार आहोत. या मोहिमेद्वारे हजारो बेकायदेशीर निर्वासितांना देशातून बाहेर काढले जाईल. पण यासाठी बरीच वर्षे आणि खूप पैसा लागू शकतो. आम्ही अमेरिकेच्या भूमीवर कार्यरत असलेल्या प्रत्येक बेकायदेशीर परदेशी टोळी सदस्याला आणि स्थलांतरित गुन्हेगाराला हाकलून लावू.

Donald Trump | '...तर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाले नसते'

ट्रम्प पुढे म्हणाले, 'मी युक्रेनमधील युद्ध संपवीन. मध्य पूर्वेतील अराजकता थांबवीन आणि तिसरे महायुद्ध होण्यापासूनही रोखेन. आपण याच्या किती जवळ आहोत याची तुम्हाला कल्पना नाही. गाझा युद्धबंदीचे श्रेय घेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर ते युद्धाच्या वेळी राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध झाले नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT