वॉशिग्टन : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप डेमोक्रेट पार्टीच्या चार महिला नेत्यांवर चांगलेच भडकले आहेत. मंगळवारी एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी, जर तुम्हाला अमेरिका आवडत नसेल, तर तुम्ही आमचा देश सोडून जा. अमेरिका हा स्वतंत्र देश आहे. अमेरिका सुंदर असून यशस्वी आहे. जर तुम्ही आमच्या देशाचा तिरस्कार करत असाल, तसेच तुम्ही या ठिकाणी खूश नसाल, तर बिनदिक्कत अमेरिका सोडून जाऊ शकता, अशा कडक शब्दात ॲलेक्झेंड्रिया ओकासियो कॉर्ट्रेज, इल्हान ओमर, रशिदा तलाइब, अयान प्रेस्ली या महिला खासदारांवर निशाना साधला आहे.
ट्रंप यांनी एकानंतर एक अशी ट्विटची मालिकाच प्रसिद्ध करत महिला नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, डेमोक्रेट पार्टीच्या चार महिला नेत्यांनी केलेले व्यक्तव्य हे आतापर्यंत कुणीच केलेले नाही. त्यांचे हे वक्तव्य देशात दूही माजविणारे असेच आहे. सभागृहात असे मत आतापर्यंत कोणीच मांडलेले नाही. या महिला नेत्यांचे वक्तव्य दहशतवादाचे समर्थन करणारे असून अमेरिका व इस्रायल विरोधी असेच आहे.
या पूर्वीही राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी काही महिला खासदारांवर वर्णद्वेशी टिप्पणी केली होती. त्यात ट्रंप यांनी या महिला खासदारांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. या ट्विटनंतर वाद निर्माण झाला होता.