Donald Trump Scold Netanyahu pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Scold Netanyahu: वेडा झालाय का... मी नसतो तर जेलमध्ये असता.. डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहूंवर एवढे का भडकले?

Anirudha Sankpal

Donald Trump Scold Netanyahu: डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोनवरून चांगलंच सुनावलं असल्याची माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलने हिज्बुल्लावर सुरू केलेले हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितलं आहे. यासाठी ट्रम्प नेतन्याहूंवर दबाव टाकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर मी नसतो तर नेतन्याहू आता जेलमध्ये असते असा धक्कादायक दावा देखील केला आहे. असं असलं तरी नेतन्याहूंनी जर हिज्बुल्लाने हल्ला करणे थांबवले नाही तर इस्त्रायल त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ला करत राहणार असं ठणकावून सांगितलं आहे.

अपशब्दाचा देखील वापर

इस्त्रायल आणि हिज्बुल्लाह यांच्यात वाढत्या तनावाच्या वातावरणात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून चांगलेच सुनावले. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या फोनकॉलवेळी डोनाल्ड ट्रम्प फार रागात होते. त्यांनी काही अपशब्दांचा देखील वापर केला.

नुकतेच इस्त्रायलने दक्षिण बैरूतमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले होते. इस्त्रायलच्या या कृतीमुळं इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला खो बसला आहे. इराणने चर्चेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे.

तू पूर्णपणे वेडा झालाय

एक्सियोसच्या वृत्तानुसार नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलताना ट्रम्प रागात होते. त्यांनी नेतन्याहू यांना त्वरित हल्ले थांबवण्यास सांगितलं.

एका अमेरिकी अधिकाऱ्याने एक्सिोसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना सांगितलं की, 'तू पूर्णपणे वेडा झाला आहेस. जर मी नसतो तर तू आता जेलमध्ये गेला असतास. मी तुझा जीव वाचवत आहे. या क्षणाला सर्वजण तुझा तिरस्कार करत आहेत. तुझ्या याच कारवायांमुळे आज सर्वजण इस्त्रायलचा तिरस्कार करत आहेत.

नेतन्याहू आपल्या निर्णयावर ठाम

ट्रम्प यांची नाराजी असली तरी नेतन्याहू यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगिण्यात येत आहे. या फोनकॉलनंतरच नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी इस्त्रायल अजूनही कडक भूमिकेतच असल्याचं त्यांनी सांगितलं.

नेतन्याहू पोस्टमध्ये म्हणतात, 'आज रात्री मी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं आहे की जर हिज्बुल्लाहने पुन्हा आमच्या शहरांवर किंवा नागरिकांवर हल्ला केला तर इस्त्रायल बैरूतमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करणार. या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. याचबरोबर इस्त्रायल सैन्य दक्षिण लेबनानमधील आपली कारवाई तशीच सुरू ठेवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT