आंतरराष्ट्रीय

… तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळेल : डोनाल्ड ट्रम्प 

Pudhari News

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

जर माझ्यावर महाभियोग चालवला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून प्रत्येकजण गरीब होईल असे अजब विधान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. व्हाईट व्हाऊसमधील तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार असल्याचे मत व्यक्त केले आहे. ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी ट्रम्प यांच्या सांगण्यावरून अवैधरित्या कॅम्पेनमध्ये योगदान दिल्याचे मान्य करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपुर्वी हा व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे एका पोर्नस्टारशी असलेले अनैतिक संबंध लपविण्यासाठी त्या पोर्नस्टारला पैसे दिल्याचे मायकेल यांनी कबुल केले आहे. रिपब्लिकन नेत्यांनी महाभियोगाने प्रतिमा आणखी मलीन होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. जर माझ्यावर महाभियोगाची कारवाई झाल्यास मार्केट पुर्णपणे कोसळेल व प्रत्येकजण गरीब होईल, असा दावा ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना केला.

ट्रम्प यांनी या मुलाखतीमध्ये रोजगार निर्मिती तसेच आर्थिक सुधारणा यावर सुद्धा भाष्य केले. ज्या व्यक्तीने उत्तम कामगिरी केली आहे त्याच्यावर महाभियोग तुम्ही कसा काय चालवू शकता असेही ट्रम्प म्हणाले. आपण काहीच चुकीचे केले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

SCROLL FOR NEXT