आंतरराष्ट्रीय

Donald Trump vs Israel : माझ्याशिवाय आज इस्रायल अस्तित्वात नसता : ट्रम्प

लेबनॉनमधून बाहेर पडण्यासाठी इस्रायलवर दबाव वाढवला

पुढारी वृत्तसेवा

एव्हियन : माझ्याशिवाय आज इस्रायल अस्तित्वात नसता. कारण इतर कोणताही राष्ट्राध्यक्ष मी जे केले ते इस्रायलसाठी करण्यास तयार नव्हता, असे थेटपणे सांगत लेबनॉनमधील हिजबुल्लाह बंडखोरांचा प्रश्न सीरिया सोडवेल, असा पर्याय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दिला. हा पर्याय देत त्यांनी इस्रायलवरील दबाव वाढवला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी इस्रायलला असा सल्ला दिला आहे की, लेबनॉनमधील इराण समर्थित हिजबुल्लाह या सशस्त्र संघटनेचा सामना सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा यांनी करावा. कारण इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे.

शरा हे अद्‌भुत काम करत असल्याचे कौतुक करत ट्रम्प जी-७ शिखर परिषदेत म्हणाले, जर इस्रायल इतर सर्वांना न मारता हिजबुल्लाहविरुद्ध हे काम करू शकत नसेल, तर ते काम सीरिया हे काम करेल.

शरा हे हिजबुल्लाहला हाताळण्यात खूप चांगले आहेत, ते त्यांना पसंत करत नाहीत, असे सांगत ट्रम्प पुढे म्हणाले, बशर अल असद यांच्या पाडावानंतर सत्तेवर आलेले माजी जिहादी असलेले सीरियन नेते काही साधेभोळे नाहीत. ते म्हणाले, इस्रायल हिजबुल्लाहविरुद्ध खूप प्रदीर्घ काळापासून लढत आहे आणि यात अनेक लोकांचा बळी जात आहे. मी इस्रायलला हिजबुल्लाहची जबाबदारी सीरियाकडे सोपवण्याचा सल्ला दिला आहे. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर मला वाटते की, ते हे काम अधिक चांगल्या प्रकारे करतील, असे ट्रम्प यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT