Donald Trump May Remove Tariff On India: अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारतावर लावण्यात आलेला २५ टक्के टॅरिफ बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचे फार यशस्वी परिणाम दिसले आहेत. बेसेंट यांच्या मते भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी रशियाकडून घेण्यात येणाऱ्या तेलात घट केली आहे. सध्याच्या घडीला हा टॅरिफ लागू आहे मात्र अमेरिका या टॅरिफला कायमस्वरूपी मानत नाहीये.
स्कॉट बेसेंट यांनी येणाऱ्या काळात भारतावर लावण्यात आलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवला जाऊ शकतो असे संकेत दिले. ते म्हणाले, 'मला वाटते की हा टॅरिफ हटवण्याबाबत एक मार्ग तयार होत आहे. जर परिस्थिती अनुकूल राहिली तर याबाबत चर्चा पुढे सरकेल. अमेरिका भारताला टॅरिफमध्ये दिलासा देऊ शकते.'
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या प्रत्येक सामानावर सध्याच्या घडीला ५० टक्के टॅरिफ लावलं आहे. यात २५ टक्के सामान्य टॅरिफ असून हे टॅरिफ भारतातील जवळपास ५५ टक्के निर्यातीवर हा कर लागू आहे. त्याचबरोबर ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने २५ टक्के अतिरिक्त तेलासंबंधीचे पेनाल्टी टॅरिफ लावले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून हा कर लावण्यात आला आहे.
रशियन तेलाबाबत जी ७ आणि युरोपियन देशांनी एक प्राईस कॅप सिस्टम तयार केली आहे. जानेवारी २०२६ पर्यंत ही कॅप जवळपास ४७.६० डॉलर प्रतीबॅरल होती. आता फेब्रुवारी २०२६ पासून ती कमी करून ४४.१० डॉलर करण्यात आली आहे. नियामानुसार जर रशियन तेल या ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीच्या पुढे गेलं तर त्यांना वीमा, शिपिंग आणि अर्थसहाय्य सारख्या सुविधा देण्यात येणार नाहीत.