Donald Trump China Visit PUDHARI
आंतरराष्ट्रीय

Donald Trump China Visit: अमेरिकेच्या दिग्गज CEO ची फौज घेऊन ट्रम्प चीनमध्ये दाखल... इराण, व्यापार कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Anirudha Sankpal

Donald Trump China Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज बिजिंगमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा २०१७ नंतरचा हा दुसरा चीन दौरा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यावर कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यासोबत मोठे व्यापारी डेलिगेशन चीनमध्ये आणले आहे. यात अमेरिकेतील डझनभर दिग्गज कंपन्यांच्या CEO चा समावेश आहे.

CEO चा फौजफाटा

अॅपलचे टीम कूक, बोईंगचे प्रमुख कायली ओर्टबर्ग, टेस्लाचे एलॉन मस्क या मोठ्या CEO चा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प चीनमध्ये दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. आज चर्चा सुरू होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे शिष्टमंडळ चीनसोबत व्यापार आणि चांगला बिजनेस करण्यासाठी उत्सक आहे. आमच्याकडून पूर्णपणे रेसिप्रोकल असणार आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलं.

जगाच्या दृष्टीकोणातून महत्वाची बैठक

ट्रम्प यांच्या या चीन दौऱ्याकडे जगभरात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या दृष्टीकोणातून देखील पाहिलं जात आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यातील चांगले नाते हे जगाच्या दृष्टीकोणातून देखील चांगली गोष्ट असणार आहे असं वक्तव्य शी जिंगपिंग यांनी केले आहे.

इराण युद्धात चीनची मोठी भूमिका

अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रूबिओ यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितलं की इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेच्या चर्चेत चीन अजून सक्रीय भूमिका निभावू शकतो अशी आशा आहे. याबाबत ट्रम्प आणि जिंगपिंग यांच्यात सकारात्मक चर्चा होईल अशी आशा आहे.

फोक्स न्यूजशी बोलताना रूबिओ म्हणाले, इराण युद्धामुळं अस्थिरता आणि आशिया अस्थिर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मुझवर संपूर्ण जग उर्जेच्या बाबतीत जास्तच अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT