Donald Trump Air Force One: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत विमान एअर फोर्स वनने उड्डाण केलं होतं. मात्र या विमानाला अँड्र्युज जॉईंट एअरबेसवर परतावं लागलं. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री याबाबतची माहिती दिली. एअर फोर्स वनमधील सर्व प्रवासी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असून काळजीची कोणतीही गोष्ट नाही असं या व्हाईट हाऊस अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.
दम्यान, एअर फोर्स वनमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स समस्या आली होती. ही काही गंभीर स्थिती नव्हती असे वक्तव्य देखील या अधिकाऱ्यानं केलं आहे. विशेष म्हणजे या तांत्रिक अडचणीनंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली स्वित्झर्लंडचा दौरा रद्द केला नाही. ते एका वेगळ्या विमानानं प्रवास करत स्वित्झर्लंडमधील दावोसला रवाना होणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एअर फोर्स वन हे विमान जगातील अत्यंत सुरक्षित विमानापैकी एक मानलं जातं. त्याचं तंत्रज्ञान आणि सुरक्षेचा स्तर हा अत्यंत चांगला असून त्याबाबतच्या नियमांचे कडक पालन केलं जातं. त्यामुळं यात छोटीशी जरी समस्या असेल तर ती हलक्यात घेतली जात नाही. त्यावर त्वरित कारवाई केली जाते. राष्ट्रपतींची सुरक्षा सर्वोच्च असते.
व्हाईट हाऊसने स्पष्ट केलं की तांत्रिक अडचणीचा राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर किंवा स्वित्झर्लंड दौऱ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून एअर फोर्स वनची तांत्रित चाचणी केली जात आहे.