आंतरराष्ट्रीय

दिव्‍यांग मॉडेल म्‍हणते तुम्‍हाला ह्रदय व बुद्‍धी देखील नाही !

Pudhari News

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

सध्‍या सोशल मीडियावर एका दिव्‍यांग मॉडेलचे नाव चर्चेत आहे. १३ वर्षाची असताना तिला एका अपघातात आपला पाय गमवावा लागला. या अपघातामुळे तिच्‍या आयुष्‍याला एक कलाटनी मिळाली. अपघातात पाय गमवाल्‍यानंतर तिचे आयुष्‍य खडतर बनले. ही मॉडेल आहे इटलीची आणि तिन्‍हे मिस इटली या सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेतला आहे. आतापर्यंत तिला दिव्‍यांग असल्‍यामुळे लोकांचे टोमणे, निंदा  याचा सामाना करावा लागला आहे.   पण अचानक या सौंदर्य स्‍पर्धेमुळे तिचे आयुष्‍य सुंदर बनले आहे. ही स्‍पर्धा न जिंकताही तिन्‍हे लोकांची मने मात्र जिंकली आहेत. 

ही घटना आहे इटलीतील, या दिव्‍यांग मॉडेलचे नाव कियारा बोर्डी आहे.  या स्‍पर्धेत  शेवटच्‍या तीन स्‍पर्धाकांच्‍यात कियाराचे नाव आहे. ही स्‍पर्धा न जिंकताही ती जिंकली आहे. एक पाय नसतानाही ती इथपर्यंत पोहचली आहे. तिच्‍या धाडसाला, प्रयत्‍नाला खरतर सलाम. आता कियारा १८ वर्षाची आहे. या स्‍पर्धेत सहभागी झाल्‍यानंतर कियारा अचानक प्रसिद्‍धीच्‍या झोतात आली. पण काही लोकांकडून तिची निंदीही करण्‍यात आली. पण तिन्‍हे या सगळ्‍याकडे सकारात्‍मक दृष्‍टीकोनातून पाहिले. त्‍यामुळे ती आज आयुष्‍यात एवढी उंची गाठू शकली आहे, असे कियाराचे मत आहे. 

कियाराने मिस इटली या सौंदर्य स्‍पर्धेत सहभाग घेतल्‍यावर लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. मला तर एक पाय नाही, पण तुम्‍हच्‍याकडे तर ह्रदय आणि बुद्‍धी देखील नाही. अशा शब्‍दात कियाराने लोकांना उत्तर दिले.

  कियारा म्‍हणते, माझ्‍यासाठी ही सौंदर्य स्‍पर्धा जिंकणे हा उद्‍देश नव्‍हता, मला एवढेच सांगायचे आहे की, आपण कसे पण असलो तरी, जग खूप सुंदर आहे. आपण कसे आहोत याहीपेक्षा आपण जगाकडे कोणत्‍या दृष्‍टीतून पाहतो  हे दिव्‍यांग कियाराकडून शिकता येते.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT