आंतरराष्ट्रीय

अमेरिकेसह जगातील लोकशाही व्‍यवस्‍था संकटात : बायडन 

Pudhari News

वॉशिंग्‍टन; पुढारी ऑनलाईन: अमेरिकेसह जगभरात लोकशाही व्‍यवस्‍था संकटात सापडली आहे, असे मत अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडन यांनी व्‍यक्‍त केले. आर्लिग्‍टन युद्‍धातील शहीदांना अभिवादन करण्‍यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

अधिक वाचा : कोरोनाची उत्पत्ती कळली नाही तर आणखी महामार्‍या

यावेळी बायडन म्‍हणाले, अमेरिकेसाठी बलिदान देणार्‍या जवानांचा त्‍याग आणि बलिदानाचे कर्ज आम्‍ही कधीच फेडू शकणार नाही. शहीदांचे स्‍मरण तुम्‍ही कसे करता, यावरच  भविष्‍यात लोकशाही व्‍यवस्‍था सुरक्षित राहणार का, हे ठरणार आहे.  एकमेकांबद्‍दल असणारी सहानभूती हीच लोकशाही व्‍यवस्‍थेची खरी ताकद आहे. आपण शेजारील राष्‍ट्रांकडे नेहमीच शत्रू म्‍हणून पाहण्‍याचा दृष्‍टिकोन बदलण्‍याची गरज आहे. शेजारील राष्‍ट्रांकडे सहानभूतीने पाहण्‍याची गरज असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. उदारीकरण, संधी आणि न्‍याय मिळण्‍याची शक्‍यता हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीमध्‍ये सर्वाधिक असते, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

ट्रम्‍प सरकारमधील फ्‍लिन यांचे धक्‍कादायक विधान

बायडन यांच्‍या विजयाला सहा महिन्‍यांपेक्षा अधिक काळ झाला तरी माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे समर्थक पराभूत झाल्‍याचे मान्‍य करण्‍यास तयार नाहीत. ट्रम्‍प सरकारमधील राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार राहिलेले माइकल फ्‍लिन यांनी नुकतेचा वादग्रस्‍त विधान करीत खळबळ उडवून दिली आहे. एका कार्यक्रमातील त्‍यांना अमेरिकेमध्‍ये म्‍यानमारसारखी परिस्‍थिती होईल का, असा सवाल करण्‍यात आला. यावेळी त्‍यांनी चक्‍क म्‍यानमारमधील सत्ता बदलाचे समर्थन करीत असाच सत्ता बदल अमेरिकेतही होणे आवश्‍यक आहे, असे धक्‍कादायक विधान केले. मागील काही दिवस ट्रम्‍प समर्थक अमेरिकेत म्‍यानमारसारखाचा सत्ताबदल होवून ट्रम्‍प पुन्‍हा राष्‍ट्राध्‍यक्ष होतील, असे स्‍वप्‍न पाहत आहेत, असा दावा 'सीएनएन' या वृत्तवाहिनीने केला आहे. 
अधिक वाचा : कोरोनाची निर्मिती वुहानमधील प्रयोगशाळेतच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT