बीजिंग : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) चिनी एआय ‘डीपसीक’चा वापर युद्धेतर कार्यासाठी सुरू केला. विशेषतः लष्करी रुग्णालयांमध्ये. हे एआय डॉक्टरांना उपचार योजना तयार करण्यात मदत करत आहे.
लष्कराच्या नागरी क्षेत्रांमध्येही त्याचा उपयोग होत आहे. हाँगकाँगस्थित साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वत्तानुसार, डीपसीकचे ओपन-सोर्स पीएलाय रुग्णालये, पीपल्स आर्म्ड पोलिस आणि राष्ट्रीय संरक्षण संचारण युनिटस्मध्ये वापरण्यात येत आहेत.