Canada Military Base Blast | कॅनडात लष्करी तळावर भीषण स्फोट; अनेक सैनिकांचा मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

Canada Military Base Blast | कॅनडात लष्करी तळावर भीषण स्फोट; अनेक सैनिकांचा मृत्यू

अल्बर्टामध्ये स्फोटानंतर आग

पुढारी वृत्तसेवा

अल्बर्टा; वृत्तसंस्था : कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील एका लष्करी तळावर शनिवारी झालेल्या भीषण स्फोटानंतर आग लागली. या दुर्घटनेत अनेक सैनिक आणि कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमींची अधिकृत संख्या अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे लष्करी यंत्रणेसह स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कॅनडाचे संरक्षणमंत्री डेव्हिड मॅकगिन्टी यांनी या दुर्घटनेची माहिती देताना, आपण यापूर्वी असे हृदयद्रावक दृश्य कधीही पाहिले नसल्याचे सांगितले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॅनडाची रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिस (आरसीएमपी) या प्रकरणाचा तपास करत आहे.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, स्फोटानंतर परिसरात आग वेगाने पसरली. जोरदार वाऱ्यामुळे आग नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांत अडचणी आल्या. अग्‍निशमन दलाच्या अनेक पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य व मदतकार्यात समन्वयाने काम करत असल्याचे स्पष्ट केले.

१३०० हून अधिक सैनिक तैनात

संबंधित लष्करी तळावर १,३०० हून अधिक सैनिक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. येथे सैनिकांना युद्धसदृश परिस्थितीत प्रशिक्षण दिले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT