आंतरराष्ट्रीय

पश्चिमी तुर्कीमध्ये शक्तीशाली भूकंपात २२ ठार; मिनी त्सुनामीने किनारी भागात पाणी शिरले

Pudhari News

इस्तंबूल : पुढारी ऑनलाईन

तुर्कीमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपात २२ जणांनी प्राण गमावला आहे. आतापर्यंत ८०० जण  जखमी झाल्याचे समोर येत आहे. ग्रीसमध्ये दोन लहानग्यांचा घरी जात असताना मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ७.० होती. या भूकंपाने पश्चिमी तूर्की आणि ग्रीस हादरला. शक्तीशाली भूकंपानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भूकंपाच्या धक्क्याने महाकाय इमारती कोसळल्या आहेत. क्राँक्रिट ब्लॉकमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

अधिक वाचा : अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचा नवा रुग्ण!

तुर्कीमधील इजमीर शहरातील एजीअन रिसॉर्टवर सर्वाधिक नुकसान झाले आहे. याच भागात जवळपास तीस लाख लोक राहतात, उंचच्या उंच इमारती आहेत. दरम्यान, दांडग्या इमारती कोसळल्याने जिवितहान किती झाली आहे याचा तंतोतंत आकडा समोर आलेला नाही. 

अधिक वाचा : शरद पवारांप्रमाणे जो बायडेन यांनाही आवरला नाही पावसात सभा घेण्याचा मोह!

शक्तीशाली भूकंपाने आलेल्या मिनी त्सुनामीने  एजीअन आयलंडमध्ये रस्त्यावर पाणी आले. तुर्की प्रशासनाने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. इजमीर हा किनारी भाग आहे. दुसरीकडे या भूकंपाने ग्रीसमध्येही धक्का जाणवला. यामध्ये दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला.  या घटनेवर तेथील पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. मुल गमावतो तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात, असे ते म्हणाले. 

अधिक वाचा : शक्तीशाली पाकिस्तानी लष्कर आणि नवाज शरीफ यांच्यातील संघर्ष आणखी पेटला!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT