आंतरराष्ट्रीय

हिंद महासागरात आढळला ‘डायनासोर’ युगातील जिवंत मासा

Pudhari News

अँतनानारिवो : पुढारी ऑनलाईन 

शार्क माशांच्या मागावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील सागरी शिकार्‍यांना मादागास्कर या देशाच्या किनारपट्टीला लागून पृथ्वीवर 42 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला व नंतर नामशेष म्हणून जाहीर झालेला मासा सापडला आहे. तोही जिवंत! हा मासा 'सीलाकॅन्थ' म्हणून ओळखला जातो. डायनासोरच्या युगातही तो अस्तित्वात होता, हे विशेष!

शिकार्‍यांनी शार्कसाठी खास प्रकारचे जाळे टाकलेले होते; पण अडकला 'मत्स्यावतार!' हिंद महासागरात जिवंत आढळलेल्या या माशाला चतुष्पाद प्राण्यांप्रमाणेच चार पाय आहेत. पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या उत्क्रांतीत अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेला हा मासा लुप्‍त झाल्याचे मानले जात होते.  शार्क माशाचे पंख आणि तेल मिळविण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात पृथ्वीच्या इतिहासाचे पट उलगडणारी अमूल्य दौलत अडकलेली आहे, याची या शिकार्‍यांना पुसटशही कल्पना नव्हती. माशाला चार पाय आहेत, हीच त्यांच्या द‍ृष्टीने नवलाईची एक बाब होती.

'रेड डेटा बुक'नुसार माशाची ही प्रजाती समुद्रतळातून नष्ट झालेली आहे. 1938 मध्ये तसे रीतसर जाहीर करण्यात आलेले होते. चार पायांचा मासा गवसल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली, तसे काही शास्त्रज्ञ तसेच जीवशास्त्राचे अभ्यासकही तटावर धडकले. लुप्‍त ठरलेला 'सीलाकॅन्थ' समोर पाहून तेही थक्‍क झाले.

SCROLL FOR NEXT