Balenciaga Mesh Tote Bag |चायनिज अभिनेत्रीने मिरवली दीड लाखाची ‘कॅरीबॅग’, सोशल मिडीयावर मिम्स चा पाऊस  
आंतरराष्ट्रीय

Balenciaga Mesh Tote Bag | चायनिज अभिनेत्रीने मिरवली दीड लाखाची ‘कॅरीबॅग’, सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

१७९० डॉलर्स किंमतीची बॅलेसियागा ब्रँडची Anthracite Nylon Mesh Tote Bag या नावाची ही बॅग आहे

Namdev Gharal

Balenciaga Mesh Tote Bag सोशल मिडीयावर कधी काही ट्रेन्ड होईल याची शाश्वती नसते. रिलस्टार अशा एखाद्या घटनेची वाटच बघत असतात. आता सध्या सोशल मिडीयावर दीड लाख रुपये किंमतीच्या ‘कॅरीबॅग’ ने धुमाकुळ घातला आहे. कारण आपल्याकडे भाजी आणण्यासाठी किंवा कोणत्‍याही दुकानातून खरेदी केली की दुकानदार कॅरीबॅग देतो. सध्या आपल्याकडे कॅरीबॅगवर बंदी आहे. तशीच ही पिवळया रंगाची कॅरीबॅग पण तिची किंमत पाहून अनेक क्रिएटर्सच्या कल्पनेला पंख फुटले आहेत. काय आहे हे प्रकरण पाहूया.

तर ही घटना घडली एका चायनिज इव्हेंटमध्ये चायनिज ॲक्ट्रेस झांग जियांग Zhang Jingyi हिने बिजिंग फिल्म फेस्टिवलमध्ये बॅलेंसियागा या ब्रॅन्डची एक बॅग कॅरी केली होती. या बॅगचे वैशिष्टये म्हणजे आपल्याकडे मिळणाऱ्या सेम कॅरीबॅगसारखी ती दिसते. पण ती आहे लक्झरी ब्रॅडंची बॅग आणि किंमत आहे १७९० डॉलर्स म्हणजे जवळपास भारतीय रुपयांत 1.5 लाख रुपये. आणि ही किंमत पाहून भारतीयांना धक्का बसेल आहे. कारण आपल्याकडे दुकानदार फुकट वाटत असलेल्या कॅरबॅगची किंमत दीड लाख. यातून अनेक क्रिएटरर्सनी यावर मिम्स् बनवायला सरु केले.

या बिजिंगमधील इव्हेंटचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. अत्‍यंत सुदंर अशा ब्लॅक गाऊनवर एक्सीसीरज म्हणून प्लासिटकची पिवळी बॅग पाहून अनेकांचे डोळे विस्फारले विशेषतः भारतीयांचे, मग अनेकांनी या बॅगचा शोध सुरु केला.

Balenciaga या लक्झरी ब्रँडची बॅग

Balenciaga बॅलेंसियागा नावाच्या लक्झरी ब्रँडची ही बॅग व तिची किंमत दीड लाख रपये आहे. बालेंसियागाचा हा 'अँथ्रासाइट नायलॉन मेश टोट बॅग' (Anthracite Nylon Mesh Tote Bag) नावाचा प्रॉडक्ट आहे. ही बॅग हुबेहूब आपण भाजीपाला किंवा किराणा सामानासाठी वापरतो तशा साध्या प्लास्टिकच्या पिशवी सारखी दिसते.

अनेकांना सुचले मिम्स

भारतीय क्रिएटर्सनी मग यावर मिम्स तयार केले असून सध्या ते ट्रेडिंग आहेत. यामध्ये एक भारतीय पती आपल्या पत्‍नीला वाढदिवसानिमित प्लास्टिकची कॅरीबॅग भेट देतो. यावर पत्‍नी अतिशय आनंदीत होते. तसेच, "आमच्याकडे अशा पिशव्या कोपऱ्यातल्या दुकानात फुकट मिळतात किंवा रद्दीत जातात," अशा आशयाचे मिम्स सर्वाधिक आहेत.लक्झरी की गरिबी?: लोकांनी म्हटले आहे की, "आता श्रीमंत दिसण्यासाठी आम्हाला आमच्या घरच्या जुन्या पिशव्याच बाहेर काढाव्या लागतील."

फॅशनचा अतिरेक: बालेंसियागाने याआधीही 'कचऱ्याच्या पिशवी'सारखी दिसणारी बॅग (Trash Bag) आणि 'बटाट्याच्या वेफर्सच्या पाकिटा'सारखी क्लच बॅग लाँच केली होती, त्यामुळे हा ब्रँड आता केवळ मिम्स बनवण्यासाठीच अशा गोष्टी करतो की काय, अशी चर्चा आहे.

बालेंसियागा (Balenciaga) या ब्रँडचे मूळ स्पेन (Spain) या देशात आहे. या ब्रँडची स्थापना १९१७ मध्ये स्पेनमधील सॅन सेबॅस्टियन शहरात झाली. याचे संस्थापक 'क्रिस्टोबल बालेंसियागा' हे स्पॅनिश होते. 1937 मध्ये त्यांनी आपला व्यवसाय फ्रान्समधील पॅरिस येथे हलवला. हा ब्रँड अशा अतरंगी गोष्टी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT