China mystery satellite Pudhari
आंतरराष्ट्रीय

China mystery satellite | जगाला अंधारात ठेऊन चीनचा रहस्यमयी उपग्रह अंतराळात 6 दिवसांनी गुप्तपणे झाला अ‍ॅक्टिव्ह; 'नासा'चे लक्ष

China mystery satellite | दक्षिण चीन समुद्रासह हिंदी महासागरावर नजर; 'शियान-28B 01' उपग्रहाच्या गूढ मिशनमागे लष्करी हेतू?

Akshay Nirmale

China mystery satellite Shiyan-28B 01 Silent satellite reactivates China space strategy Low inclination orbit Space surveillance South China Sea orbit

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या अंतराळ मोहिमेतील एक नवीन आणि गूढ पाऊल जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. शियान-28B 01 नावाचा एक रहस्यमयी उपग्रह, जो 3 जुलै 2025 रोजी झिचांग सॅटेलाईट लॉन्च सेंटर वरून प्रक्षेपित करण्यात आला होता.

तब्बल 6 दिवस हा उपग्रह पूर्ण मौनात होता आणि कोणत्याही जागतिक ट्रॅकिंग सिस्टमने त्याला टिपले नव्हते. अखेर, 9 जुलै रोजी यूएस स्पेस फोर्सच्या Space Domain Awareness Unit ने त्याचा शोध लावला.

6 दिवसांनी ‘सक्रिय’ झालेला उपग्रह – संशयाची सुरूवात

सामान्यतः उपग्रह प्रक्षेपणानंतर 24 ते 48 तासांत ट्रॅक होऊ लागतात. मात्र शियान-28B 01 ने त्याच्या प्रक्षेपणानंतर जवळपास 144 तासांपर्यंत कोणताही सिग्नल दिला नाही किंवा हालचाल दाखवली नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर अनेक शंका निर्माण झाल्या.

9 जुलै रोजी त्याचे स्थान 794 × 796 किमी उंचीच्या कक्षेत आणि फक्त 11 अंश कक्षवक्रता (inclination) असलेले नोंदवले गेले. हे अत्यंत असामान्य वर्तन मानले जात आहे, कारण प्रक्षेपणाच्या वेळी त्याचा अपेक्षित कोन 35 अंश होता.

पृथ्वीभोवतालच्या कक्ष वक्रतेत तिपटीने बदल

या उपग्रहाचे रॉकेट तीन वेळा कक्षा बदलून त्याला कमी कोनाच्या दिशेने वळवण्यात आले. या हालचाली सामान्य वैज्ञानिक उद्देशांपेक्षा रणनीतिक आणि लष्करी हेतूंशी संबंधित असू शकतात, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

जोनाथन मॅकडॉवेल या नामवंत अंतराळ तज्ज्ञाने नमूद केले की, "चीनने इतक्या कमी कक्षवक्रतेचा वापर याआधी कधीच केलेला नाही." हे कक्षवक्र दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरावरून जाते – ही बाब भारत आणि इतर शेजारी देशांसाठी चिंतेची ठरू शकते.

शियान सॅटेलाईट सीरीजचे गूढ स्वरूप

चीनने नेहमीच असा दावा केला आहे की, ‘शियान’ उपग्रह मालिका ‘अंतराळ अभ्यासासाठी’ वापरली जाते. परंतु अनेक वेळा हे उपग्रह लष्करी प्रायोगिक हेतूंनी वापरले जातात, अशी जागतिक शंका आहे.

अलीकडेच दोन शियान उपग्रहांनी कक्षा डॉकिन्ग (orbital docking) व इंधन भरण्याचे प्रयोग यशस्वीरीत्या केले. हे लष्करी उपयोगासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जाते.

उपग्रहाकडे नासाचेही लक्ष

नासाने या उपग्रहावर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. चीनचा अंतराळ कार्यक्रम फक्त चंद्र-मंगळ मोहिमांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो जागतिक सामरिक समतोलही ढवळून काढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चीनच्या अंतराळ मोहिमांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि अशा रहस्यमय हालचालींमुळे जागतिक पातळीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः भारत, अमेरिका आणि इंडो-पॅसिफिक भागातील देश या हालचालीकडे सतर्कतेने पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT