Indonesian Children Sliding on Python 
आंतरराष्ट्रीय

Children Sliding on Python : महाकाय अजगराच्या पाठीवरच मुलांनी सुरु केली घसरगुंडी!, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

इंडोनेशियातील प्रकार, बिनधास्त खेळत आहेत अजगराबरोब, व्हिडीओ व्हायरल

Namdev Gharal

Indonesian Children Play On Python लहान मुले बागेत झोपाळे किंवा घसरगुंडीवर खेळताना दिसणे अगदी सामान्य आहे, मात्र इंडोनेशियातील मुलांच्या एका गटाने खेळाचा एक भलताच थरारक प्रकार समोर आणला आहे. ही मुले एका महाकाय अजगराच्या अंगावर चढून, त्यावर बसून चक्क घसरगुंडी खेळताना दिसली. या महाकाय सरपटणाऱ्या प्राण्याच्या पा त्यांनी खेळण्यातील घसरगुंडीसारखेच ते त्‍याच्या पाठीवरुन घसरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडेल. पण ती मुले मात्र अगदी बिनधास्तपणे घसगुडींचा खेळ खेळताना दिसत आहेत.

या धक्कादायक दृश्यामुळे नेटकऱ्यांनी मुलांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा अजगर ‘रेटिक्युलेटेड पायथन’ (Reticulated Python) असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी जगातील सर्वात मोठ्या आणि लांब सापांच्या प्रजातींपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे मुले या अजगरासोबत खेळत असताना जवळच काही मोठी माणसेही उभी असल्याचे दिसून आले. त्‍यांनाही हा प्रकार नवीन नसावा असे दिसते. अमेरिकेत व इंडोनेशियात अजगर घरी पाळले जाते. पण शेवटी वन्य प्राणी असल्याने त्‍याच्या पासून जीवाला नक्कीच धोका असतो.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन लहान मुले या अजगरासोबत बिनधास्त खेळताना दिसत आहेत. काही मुले त्याच्या लांब शरीरावरून घसरत आहेत, तर काही मुले एखाद्या खेळण्यावर बसावे तसे त्याच्या अंगावर बसून इकडे-तिकडे हालचाल करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मोठी माणसे या मुलांकडे पाहत शांतपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना दिसतात. त्यांच्या या बेफिकीरीपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढ्या मोठ्या वन्यजीवाच्या इतक्या जवळ मुलांना जाऊ देण्यात त्‍यांना धोका कसा वाटत नाही असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

अजगर विषारी नसला तरी विळखा घालून जीव घेऊ शकतो

व्हिडिओतील साप हा ‘रेटिक्युलेटेड पायथन’ असल्याचे समजते. हे अजगर विषारी नसले, तरी ते अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकतात. हे जगातील सर्वात लांब सापांपैकी एक आहेत. हे अजगर आपल्या भक्ष्याभोवती शरीराची घट्ट विळखा घालून त्याचा श्वास कोंडून मारतात. जरी हा प्राणी शांत वाटत असला, तरी त्रास दिल्यास, घाबरवल्यास किंवा धोका जाणवल्यास तो क्षणात आक्रमक होऊन हल्ला करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT