Charity Pierce वजन कमी करण्यासाठी आपण हजार प्रकार करत असतो पण एक महिला अशीही होती जिने आपल्या आयुष्यात 230 किलो वजन कमी केले. मग तिचे वजन होते तरी किती तर तब्बल 350 किलो. एवढे वजन कमी करुन तिची जगण्याची इच्छा मात्र अपूरी राहिली व शेवटी वयाच्या 50 व्या वर्षी तिने 27 जानेवारी 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला. या महिलेचे नाव होते चॅरिटी पिअर्स.
350 किलो वजनासह काही वेळा तिला बेडवरुन उठता पण येत नव्हते पण तिने परिस्थितीपुढे हात नाही टेकले व हालचाल न करताही जगात ओळख निर्माण केली TLC या चॅनेलवरील रिॲलिटी शो My 600-Lb Life याव्दारे ती घराघरात पोहचली होती. चैरिटी पियर्स (Charity Pierce) या अमेरिका (USA) या देशाच्या रहिवासी होत्या. त्या मूळच्या अमेरिकेतील आयोवा राज्यातील 'सीडर रॅपिड्स' शहरात राहत होत्या. त्यांच्या वजनाविरुद्धच्या लढाईसाठी त्यांनी टेक्सास (Texas) येथील डॉक्टरांची मदत घेतली होती.
230 किलो वजन घटवले होते
सुरुवात: चैरिटी जेव्हा 'My 600-Lb Life' च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसली, तेव्हा तिचे वजन सुमारे ३५० किलो (७७८ पाउंड) होते. इतक्या अवाढव्य वजनामुळे तिला हालचाल करणेही कठीण झाले होते. पण अमेरिकेतील प्रसिद्ध सर्जन डॉ. नाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तिने वजन कमी करण्याचा कठीण प्रवास सुरू केला. तिने गॅस्ट्रिक बायपास सर्जरी आणि जास्तीची त्वचा काढण्यासाठी (Skin Removal) अशा अनेक शस्त्रक्रिया केल्या. एका टप्प्यावर तिने आपले वजन २३० किलोहून अधिक (५००+ पाउंड) कमी केले होते. तिचा हा बदल पाहून लाखो लोक थक्क झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चैरिटी गेल्या दोन महिन्यांपासून फुफ्फुसांत पाणी होणे आणि 'लिम्फेडेमा' (Lymphedema - शरीराला सूज येणे) यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा त्रास होत होता. मृत्यूसमयी तिचे कुटुंबीय तिच्या सोबत होते. तिची मुलगी चार्लीने भावनिक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझी आई आता शांत आहे आणि तिच्या वेदना संपल्या आहेत."
अनेकांना दिली वजन कमी प्रेरणा
चैरिटी पियर्सच्या जाण्याने तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिने वजनाविरुद्ध दिलेल्या लढ्याने जगभरातील लठ्ठपणाशी झगडणाऱ्या लोकांसाठी ती एक प्रेरणा ठरली होती.
'My 600-Lb Life' शो काय आहे
TLC वरील 'My 600-Lb Life' हा एक अत्यंत लोकप्रिय अमेरिकन रिॲलिटी टीव्ही शो आहे. हा शो अशा व्यक्तींच्या जीवनावर आधारित आहे ज्यांचे वजन ६०० पाउंड (सुमारे २७२ किलो) किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या व्यक्तींना त्यांच्या वजनामुळे चालणे, फिरणे किंवा दैनंदिन कामे करणेही अशक्य झालेले असते. हा शो त्यांच्या वजन कमी करण्याच्या कठीण प्रवासाचे चित्रण करतो.