आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता

backup backup

वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणखी एका गुन्ह्यात अडकण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांच्यावर काही सिक्रेट दस्तावेज आपल्या घरी नेल्याचा आरोप आहे. त्याची सध्या चौकशी करणार्‍या न्याय विभागाच्या विशेष सल्लागार मंडळाच्या फिर्यादीने ट्रम्प यांच्या वकिलाला माहिती दिली आहे की, या चौकशीत त्याला टार्गेट केले जात आहे.

विशेष सल्लागार मंडळाने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून लचकरच ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारीचा खटला दाखल केला जाणार आहे. यावर ट्रम्प म्हणाले, माझ्यावर गुन्हेगारीचा खटला दाखल केला जाणार असल्याबाबत मला काहीच माहिती नाही. मी काहीच चुकीचे केले नसल्याने मला घाबरण्याची गरज नाही. यापूर्वीही ट्रम्प यांनी माझ्यावर चालवले जाणारे सर्व खटले राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. 2024 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठीच सर्व काही केले जात असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
बाजू मांडण्याची संधी

न्याय विभागाकडून संबंधिताला नोटीस पाठवून त्याला ज्युरीसमोर आपली बाजू मांडण्याची संधी होते. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या वकिलांनी ट्रम्प यांच्या खटल्याबाबत न्याय विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्याशिवाय कॅपिटल हिलमधील हिंसाचारप्रकरणी ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्‍यांसह अनेक लोक चौकशीच्या फेर्‍यात असून त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर ट्रम्प यांच्या गुन्हेगारीचा चार्ज लावला जाऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT