आंतरराष्ट्रीय

Liverpool celebration mishap : ब्रिटनमध्ये 'विक्ट्री परेड'मध्‍ये घुसली कार, ४७ जणांना उडवले!

लिव्हरपूलमधील घटना, जखमींमध्‍ये चार मुलांचा समावेश; कार चालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

Liverpool celebration mishap : ब्रिटनमधील लिव्हरपूल ( Liverpool) शहरात प्रीमियर लीग विजेतेपदाचा आनंद साजरा करणाऱ्यासाठी आयोजित 'विक्ट्री परेड' (विजय मिरवणूक) मध्‍ये कार घुसली. कार चालकाने ४७ जणांना उडवले. २७ जणांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्‍ये चार मुलांचा समावेश आहे. कार चालकाला अटक करण्‍यात आली आहे. हा दहशतवादी हल्‍ला नव्‍हता, आम्‍ही सर्व पातळीवर तपास करत आहोत, असे लिव्‍हरपूल पोलिसांनी म्‍हटलं आहे. ही घटना भयंकर असून, याच्‍या सखोल चौकशीचे आदेश दिल्‍याचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

भरधाव कार थेट गर्दीत घुसली

या घटनेबाबत माहिती देताना मर्सीसाइड पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, गर्दी कार घुसवून तब्‍बल ४७ जणांना जखमी करणार्‍या कार चालकास अटक करण्‍यात आली आहे. तो लिव्‍हरपूर परिसरातील ५३ वर्षांचा रहिवासी आहे. कोणीही या घटनेवर तर्कविर्तक लढवू नयेत. अटक करण्‍यात आलेला चालक हा ब्रिटिश आहे. या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी सखोल तपास सुरु आहे.

संतप्‍त लोकांनी कारच्‍या काचा  फोडल्‍या

प्रीमियर लीग विजेतेपद मिळवणार्‍या ओपन-टॉप संघाने लिव्‍हरपूल शहारातील मुख्‍य रस्‍त्‍यावर विक्‍ट्री परेडचे आयोजन केले होते. या विजयी मिरवणुकीत समर्थकांनी फटाके फोडू नयेत. तसेच ड्रोनचा वापर टाळावा, असे पोलिसांनी स्‍पष्‍ट केले होते. विक्‍ट्री परेडमध्‍ये हजारो समर्थक सहभागी झाले होते. यावेळी अचानक गर्दी भरधाव वेगाने आलेली कार घुसली. या घटनेचा एका व्‍हिडिओ समोर आला आहे. यामध्‍ये फुटबॉल चाहत्यांच्या मोठ्या गर्दीकडे वेगाने जाणारी एक कार दिसत आहे. कारची धडक अनेकांना बसली. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भरधाव वेगाने आलेली कार गर्दीत घुसली. अनेकांना उडवले. संतप्‍त लोकांनी कारच्‍या कारचा फोडल्‍या. तरीही कारचालकने पुढे जात राहिला. त्‍याने अनेकांना धडक दिली. कार थांबली तेव्हा संतप्त चाहत्यांनी गाडीला घेरले. पोलिसांनी कारकडे धाव घेत गर्दीला रोखले. कार चालकाला ताब्‍यात घेतले.

भयंकर घटना : पंतप्रधान कीर स्टार्मर

गर्दी कार घुसून ४७ जणांना उडवणे, ही एक भयंकर घटना आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्‍हटले आहे. या घटनेचा सखोल तपासाचे आदेश त्‍यांनी दिले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्‍या पाेस्‍टमध्‍ये लिहिले की, "लिव्हरपूलमध्ये घडलेली दृश्ये भयानक आहे. जखमी आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई केल्‍याने मी पोलिस आणि आपत्कालीन सेवांचे आभार मानतो."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT