UAE Highest Honour | कॅप्टन स्मित मच्छार यांना 'यूएई'चा सर्वोच्च सन्मान -
आंतरराष्ट्रीय

UAE Highest Honour | कॅप्टन स्मित मच्छार यांना 'यूएई'चा सर्वोच्च सन्मान

राष्ट्राध्यक्षांनी मारली मिठी; ‘तुम्ही आमच्या देशाची ओळख’ म्हणत केले कौतुक

पुढारी वृत्तसेवा

अबुधाबी; वृत्तसंस्था : फ्लायदुबईच्या विमानाला अपघातग्रस्त करण्याचा सहवैमानिकाचा कथित प्रयत्न हाणून पाडणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ‘ऑर्डर ऑफ झायेद द्वितीय’ या प्रथम श्रेणी सन्मानाने गौरविले. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी स्मित यांची गळाभेट घेत त्यांचे अभिनंदन केले. दुबईचे युवराज शेख हमदान यांनीही स्मित यांच्या धैर्याचे कौतुक करत तुम्ही आमच्या देशाची ओळख आहात, असे कौतुकोद्‌गार काढले.

हा सन्मान यूएईमधील महत्त्वाच्या नागरी सन्मानांपैकी एक मानला जातो. विमानातील संकटाच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याबद्दल विमानाच्या अन्य कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला यूएईचे उपराष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान तसेच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम उपस्थित होते. दुबईचे युवराज शेख हमदान यांनी सोशल मीडियात स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले. त्यांनी जबाबदारी, प्रसंगावधान आणि मानवी सुरक्षेप्रती बांधिलकीचे उदाहरण घालून दिल्याचे नमूद केले. उपचार सुरू असताना युवराजांनी रुग्णालयात स्मित यांची भेट घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT