Captain Smit UAE Deputy PM Hamdan bin Mohammed Al Maktoum भारतीय वैमानिक स्मित मछार यांनी 30 सप्टेबर रोजी फलाय दुबईच्या विमानात झालेल्या हल्ल्यातून सावरत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या धाडसाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कौतूक केले होते. जखमी अवस्थेत त्यांनी विमानासह प्रवाशांचे प्राणा वाचवले होते. जगभरातून त्यांच्या या कृतीचे समर्थन केले जात आहे. आता युएईचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम यांनी शनिवारी रुग्णालयात भेट घेऊन त्यांचे कौतूक केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबई (Flydubai) विमानावर बुधवारी घडलेल्या एका घटनेत ओमानी सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये भारतीय वैमानिक समित मच्छार यांच्यावर इमर्जन्सी कुऱ्हाडीने (Crash Axe) हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले वैमानिक समित मच्छार सध्या अबुधाबी येथे उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सौदी अरेबियातील तबुक येथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना अबुधाबी येथे हलवण्यात आले.
युएईच्या उपपंतप्रधानांकडून भेट
युएईचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम यांनी शनिवारी अबुधाबी येथे जाऊन भारतीय वैमानिक समित मच्छार यांची भेट घेतली. सहवैमानिकाच्या हल्ल्यादरम्यान प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्याचे त्यांनी कौतुक केले.
भेटीनंतर 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये हमदान म्हणाले की, "मच्छार यांनी असीम धैर्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाप्रती काळजीचे सर्वोच्च उदाहरण दाखवले आहे." त्यांनी युएईच्या नेतृत्वाकडून त्यांचे आभार मानले. पुढे बोलताना ते म्हणाले, "ते आमच्या टीमचा भाग आहेत, आमच्या देशाचा एक भाग आहेत आणि युएई ज्या मूल्यांसाठी उभा आहे—दया, शांतता आणि जीवन—त्याचे ते प्रतीक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे."
दरम्यान युएईच्या ॲटर्नी जनरल कार्यालयानुसार, १७४ प्रवासी असलेल्या 'FZ1073' या विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ओमानी सहवैमानिकाने क्रॅश ॲक्सने (कुऱ्हाडीने) मच्छार यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेतही मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडून मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर प्रवासी आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी मिळून हल्लेखोराला रोखून त्याच्यावर नियंत्रण मिळवले. विमानातील रिझर्व्ह क्रूने (राखीव चमूने) विमानाचे तबुक विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती फोनवरुन चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅप्टन स्मित मछार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी स्मित यांच्या धैर्याचे, प्रसंगावधानाचे आणि कठीण परिस्थितीतही संयम दाखवल्याबद्दल कौतुक केले होते.