पुढारी ऑनलाईन डेस्क: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा व पक्षनेतृत्वचाही राजीनामा दिला आहे. ट्रुडो यांच्या राजिनाम्यामुळे कॅनडामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
ट्रुडो यांच्या राजिनाम्यामुळे कॅनडामधील त्यांच्या दहा वर्षांच्या सत्तेचा शेवट झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता ट्रुडो यांनी राजीनामा सादर केला. त्याच्या विरोधात पक्षामध्ये असंतोष वाढतच चालला होता. या असंतोषामुळे ट्रुडो राजीनामा देण्याच्या तयारीत हाते. त्यांच्याबरोबर कॅनडाच्या अर्थमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे.
कॅनडा सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तेथील लिबरल पार्टीचा नेता निवडेपर्यंत ट्रुडो हेच काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
जस्टिन ट्रुडो हे २०१५ साली कॅनडाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. यापूर्वी तिथे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे सरकार होते. सुरवातीला त्यांच्या धोरणांमुळे त्यांची वाहवा झाली होती. पण अलिकडील काही वर्षात खाण्यापिन्याच्या वस्तू व घरांच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने जनतेत रोष निर्माण झाला होता. तसेच सध्या सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला वस्तूवंर कर वाढवण्याचा इशारा दिला होता.जर कॅनडातून बेकायदेशीर प्रवेश करणारे प्रवासी व अंमली पदार्थ यावर कॅनडाने नियंत्रण नाही आणले तर अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तंवर २५ टक्के कर लावला जाईल असे त्यांनी म्हटले होते.