California shooting
वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील स्टॉकटन येथे गोळीबाराची घटना घडली आहे. एका बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.
सॅन जोक्विन काउंटी शेरिफ ऑफिसच्या प्रवक्त्या हीदर ब्रेंट यांनी सांगितले की, मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
एका बँक्वेट हॉलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. ब्रेंट म्हणाले की, या घटनेचा तपास सुरू आहे, परंतु प्राथमिक माहितीवरून असे दिसते की, हा लक्ष्य करून हल्ला केला आहे. अधिकारी सध्या संभाव्य हेतूचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी जखमींबद्दल अधिक माहिती जाहीर केलेली नाही, फक्त असे म्हटले आहे की अनेक लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.