प्रातिनिधिक छायाचित्र. AI image
आंतरराष्ट्रीय

viral story : केकच्‍या एका तुकड्याने...२५ वर्षांचा संसार मोडला! एका 'दुर्लक्षित' पत्‍नीची भावनिक पोस्‍ट व्‍हायरल

पतीने आजवर केलेल्‍या दुर्लक्ष आणि केवळ वस्‍तू म्‍हणून केलेल्‍या वापरासाठी केकचा तुकडा ठरला प्रतीक

पुढारी वृत्तसेवा

Marriage ends over a cake piece viral story

न्यूयॉर्क : २५ वर्षांचा संसार... एकत्र घालवलेली असंख्य क्षणांची कहाणी; पण इतका प्रदीर्घ प्रवास फक्त ‘केकचा तुकडा’ या किरकोळ कारणावरून मोडला, याची कल्पनाही तुम्‍ही करनाही नाही. मात्र एका महिलेने २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा शेवट भांडणामुळे नाही तर केकच्‍या एका स्लाईसमुळे झाला. तिने सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म 'रेडिट'वर पोस्‍ट करत विवाहानंतर झालेला भावनिक कोंडमारा आणि पत्‍नीकडून झालेल्‍या दुर्लक्षासाठी केकचा तुडका कसा प्रतीक बनला, याची गोष्‍ट सांगितली आहे.

महिलेने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, मी ४६ वर्षांची आहे. आपल्याशी भावनिकदृष्ट्या दूर गेलेल्‍या पतीसोबतचा संसार वाचवण्यासाठी 'शेवटचा प्रयत्न' म्‍हणून लग्‍नाचा वाढदिवसानिमित्त सहलीचे नियोजन केले. आशा होती की या निमित्ताने त्‍यांच्‍या नात्‍यात पुन्‍हा बहर येईल; पण ही व्‍यर्थ ठरली! संपूळे हातात हात नसणे आणि उदासीनतेचे वातावरण, अशा नेहमीच्याच निराशा वाट्याला आल्या. ही सहल म्हणजे एक असमाधानाचा प्रवासच ठरला.

केकचा तुकडा ठरला घटस्‍फोटाचे कारण!

पती आणि पत्‍नी हॉटेलच्या खोलीत परतले. बाहेर फिरायला जाण्‍यापूर्वी पत्‍न्‍ने केकचा एक तुकडा दुसऱ्या दिवशी सकाळी निवांत खाण्यासाठी जपून ठेवला होता. तिच्‍यासाठी ही एक छोटाशी वैयक्तिक चैन होती. तिला जेव्‍हा सकाळी जाग आली तेव्हा केकचा तुकडा गायब झाला होता. तो नवर्‍याने खाल्‍ला होता. आता यावर दिलगीरी व्‍यक्‍त करण्‍याऐवजी तो हसत म्हणाला की, "मला रात्री भूक लागली, म्हणून मी तो खाल्ला." त्याने फक्त रिकामी पेटी आणि प्रतीकात्मक म्हणून एक घास शिल्लक असलेला डबा ठेवला होता.

केकचा तुकडा ठरला भावनिक दुर्लक्षपणाचे प्रतीक

महिलेने म्‍हटले आहे की, आता मी आता तुकड्यांवर समाधान मानण्याचे नाटक करणे थांबवले आहे. माझा आणि माझ्‍या पतीमधील वाद हा काही केकसाठी नव्‍हता. गेली दोन दशक भावनिक दुर्लक्षणपाचे प्रतीक हा केकचा तुकडा ठरला. माझ्‍या लक्षात आले की आपली भूमिका 'घरातील एक नोकर, आई आणि लैंगिक वस्तू' एवढीच राहिली आहे. तिने कुटुंबासाठी सर्व 'कष्टाची कामे' केली; पण बदल्यात तिला फक्त 'त्याचे तुकडे' मिळाले. तिच्या नवऱ्याने तिचा वैयक्तिक आनंद इतक्या सहजपणे खाऊन टाकणे, हे त्यांच्या संपूर्ण वैवाहिक जीवनाचे एक लहानसे चित्र होते: तिच्या गरजा आणि सीमांकडे संपूर्ण दुर्लक्ष. तीव्र आत्म-सन्मानाच्या भावनेने तिने पतीला सांगितले की, तिला अशा जोडीदाराची गरज आहे, जो तिचा केक खाणार नाही, तर माझ्‍यासाठी केक जपून ठेवले. तिने प्रेम नसलेल्या संसाराच्या उरलेल्या तुकड्यांसाठी कृतज्ञ राहणे थांबवले आणि आपला २५ वर्षांचा विवाह सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT