जर्मन कार निर्माता कंपनी BMW ला न्यायालयाने १.९ दशलक्ष यूएस डॉलर (अंदाजे 15.86 कोटी रुपये) ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.  Twitter
आंतरराष्ट्रीय

कारच्‍या दरवाजामुळे अंगठा तुटला, कंपनीला द्यावी लागणार तब्‍बल १६ कोटींची भरपाई!

पुढारी वृत्तसेवा

ग्राहकाला नुकसान भरपाई म्‍हणून १.९ दशलक्ष यूएस डॉलर ( सुमारे 15.86 कोटी रुपये) देण्‍यात यावेत, असा आदेश जर्मनीतील न्‍यायालयाने कार कंपनी BMW ला दिला आहे. कारच्या दारात बिघाड झाल्यामुळे कार मालकाचा अंगठा तुटला होता. त्‍याने नुकसान भरपाईसाठी न्‍यायालयात धाव घेतली होती. तब्‍बल आठ वर्ष न्‍यायालयीन लढाईनंतर त्‍याला दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील वृत्त 'न्‍यू यॉर्क पाेस्‍ट'ने दिले आहे. (Personal Injury Compensation)

नेमकं काय घडलं होतं?

न्‍यू यार्कमधील सॉफ्टवेअर अभियंता गॉडविन बोटेंग यांनी BMW X5 कार घेतली. या कारमध्ये सॉफ्ट क्लोज डोअरची सुविधा हाेती. म्‍हणजे या कारची रचना अशी होती की, कारच्‍या दरवाज्‍यावर कोणत्याही वस्तू असेल तर दरवाजा बंद होणार नाहीत;पण गॉडविन बोटेंग यांनी दावा केला की, कारच्या दारवाजात तांत्रिक दोष होता. त्यामुळे सॉफ्ट क्लोज डोअर सिस्टीम कार्यरतच नव्‍हती. दरवाजा इतक्या वेगाने बंद झाला की, आपल्‍याला हात काढायलाही वेळ मिळाला नाही. त्‍यांच्‍या उजव्या अंगठ्याचे वरचे टोक पूर्णपणे कापले गेले. त्‍यांनी तत्‍काळ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मात्र त्‍यांना अंगठ्याचा तुटलेला भाग पुन्‍हा जाेडता आला नाही.

आठ वर्ष चालली कायदेशीर लढाई

गॉडविन बोटेंग यांनी नुकसान भरपाईसाठी न्‍यायालयात धाव घेतली. बोटेंग यांनी दावा केला की, अंगठा तुटल्‍याने सॉफ्टवेअर अभियंता म्हणून त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. त्यांना वार्षिक 250,000 डॉलर (2.08 कोटी रुपये) उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते. तपासणीत दरवाजामध्ये कोणताही दोष आढळून आला नाही, असा दावा कंपनीने केला. तब्‍बल आठ वर्ष या खटल्‍याची सुनावणी सुरु होती. अखेर BMW नुकसान भरपाईसाठी जबाबदार असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आले. न्यायालयाने BMW कंपनीला कार मालकाला भरपाई म्हणून US $ 1.9 दशलक्ष (रु. 158,641,083) इतकी रक्कम देण्याचे आदेश दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT