काबूल : पुढारी ऑनलाईन
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अश्रफ घनी दुसर्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ घेत होते. यावेळी तेथे मोठा धमाका झाला. यासोबतच गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रपती घनी यांना यावेळी त्यांच्या अंगरक्षकांनी वेडा दिला. धमाका होवूनही अशरफ घनी यांनी उपस्थित लोकांना प्रोत्साहन देत शपथ वाचन सुरुच ठेवले.
अश्रफ घनी दुसर्यांदा झाले राष्ट्रपती
अश्रफ घनी यांनी दुसर्यांदा राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. यावेळी मोठा धमाका झाला, घटनास्थळी हाहाकार उडाला. यावेळी राष्ट्रपती अश्रफ घनी म्हणाले की, आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही. अफगाणिस्तानला माझ्या बलिदानाची गरज असेल तर मी देण्यास तयार आहे.
यासोबतच अफगानिस्तानच्या प्रथम महिला रुला घनी या देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी देखील यावेळी लोकांना देखील उठून उभे राहून अभिवादन केले.
यासोबतच अश्रफ घनी यांचे प्रतीस्पर्धी अब्दुल्ला यांनी देखील स्वत:लाच राष्ट्रपती घोषित केले आहे.