मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये वाचावी, अशी ४ पुस्तके सुचवली आहेत. त्यांच्या लेखाचे हे भाषांतर. मूळ लेखाची लिंक Books to keep you warm this holiday season.
तुम्हा सर्वांना सुट्यांच्या शुभेच्छा!! मला खात्री आहे, तुम्ही तुमचे प्रियजन वर्षांतील सर्वांत आनंददायी क्षण व्यतित करत असाल. कुटुंबांसोबत आनंददायी क्षण व्यतित करताना तुम्ही काही चांगली पुस्तके वाचण्यासाठी वेळ नक्कीच काढाल.
तुम्हाला काही नवीन वाचायची इच्छा असेल तर मी येथे चार पुस्तकांची यादी देत आहे, जी मी या वर्षांत वाचली आहेत. ही पुस्तके अशी जी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय सुरू आहे, याचे आकलन करून देतील. अर्थात मी काही ठरवून ही थिम ठरवलेली नाही, पण हे आपोआपच जुळून आले. जगात वेगाने बदल होत असताना प्रयत्न करणे आणि हे बदल समजून घेणे ही नैसर्गिक बाब आहे, आताही आपल्या आजूबाजूला असेच घडत आहे.
माझ्या यादीतील दोन पुस्तके ही भविष्याबद्दल आहेत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आणि तंत्रज्ञानातील बदलामुळे आपले जगणे, शिकणे आणि प्रेम करणे कसे बदलत आहे, हे याबद्दलची ही पुस्तके आहेत. एक पुस्तक भूतकाळाशी संबंधित आहे. भूतकाळात कठीण परिस्थितीशी नेत्यांनी कसा सामना केला, याबद्दलचे हे पुस्तक आहे. आणि शेवटचे पुस्तक आहे, ते पूर्ण वर्तमानाशी संबंधित आहे. आपल्या समाजासाठी जो अदृश्य आणि विस्मयकारक कणा आहे, ते समजण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
मी एक बोनस पुस्तकही सुचवत आहे, तुमच्या टेनिसप्रेमी मित्राला भेट देण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे. अर्थात कितीही पुस्तके सुचवली तरी ती कमी असणार आहेत.
मी डोरिस यांच्या पुस्तकांचा फार मोठा चाहता आहे. हे पुस्तक डोरिस आणि त्यांच्या पतीबद्दल आहे. त्यांचे पती राष्ट्राध्यक्ष केनेडी आणि जॉन्सन यांच्यासोबत भाषण लेखक आणि धोरणतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. अमेरिकेच्या सर्वाधिक अस्वस्थ अशा कालखंडावर बेतलेले असे हे पुस्तक आहे. केनेडी यांची हत्या, व्हिएतनाम युद्ध यावरील पुस्तकांइतकेच हे पुस्तकही चित्तथरारक आहे.
आताच्या काळात जे लोक तरुणांना वाढवत आहेत, त्यांच्यासोबत काम करत आहे, किंवा त्यांना शिकवत आहेत, त्यांनी हे पुस्तक आवश्य वाचले पाहिजे. मुलांचे बालपण आता खेळांवर आधारित न राहता फोनवर अवलंबून राहू लागले आहे, याचा मुलांच्या विकासावर आणि त्यांच्या भावनिक प्रक्रियेवर कसा परिणाम होतो, यावर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात फक्त समस्या मांडलेल्या नाही तर खऱ्या जगाला लागू पडतील असे उपायही सांगितले आहेत.
तुम्हाला जमिनीतून बाहेर आलेली एखादी पाईप दिसली असेल आणि याचा नेमका उपयोग काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर तुमच्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे. आपण आपल्या आजूबाजूला केबलचे बॉक्स पाहातो, मोबाईलचे टॉवर पाहातो, ट्रान्सफॉर्मस पाहातो. या सर्वांचे काम कसे चालते, याची माहिती या पुस्तकात दिलेली आहे. तुमच्या मनातील कुतूहल शमवण्याचे काम हे पुस्तक करेल.
शास्त्रीय इतिहासाची अतिशय खोलवर समजा मुस्तफा यांना आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, तसे जीन एडिटिंगसारखी शास्त्रीय प्रक्रिया आपल्या समाजाला कसा नवा आकार देणार आहे, याचे उत्तर या पुस्तकातून मिळते. मुस्तफा यातील धोकेही सांगतो आणि त्यासाठी आपण काय तयारी केली पाहिजे, जेणे करून आपल्याला या तंत्रज्ञानाचे लाभ मिळवता येतील, याची माहिती देतात. आर्टिफिशिअल इंटलेजिन्सचा उदय कसा होत आहे, हे समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक सर्वोत्तम आहे.
मी सुचवत असलेले बोनस पुस्तक आहे Federer हे आहे. डोरिस हेन्केल यांनी लिहिलेले पुस्तक मात्र सर्वांसाठी नाही. ते महागही आहे आणि चांगले वजनदार आहे. तुम्ही जर रॉजरचे चाहते असला तर त्याचे जीवन आणि करिअर यावर सिंहावलोकन म्हणून हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. मला रॉजरच्या टेनिसमधील इतिहास बऱ्यापैकी चांगला माहिती आहे, पण या पुस्तकातून त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल फार चांगली माहिती मिळाली. तुमच्या जीवनातील टेनिस फॅन्ससाठी हे सर्वोत्तम पुस्तक आहे.