Bangladesh Donald Trum सध्या बांगलादेशमधील एका रेड्याची जगभरात चर्चा होत आहे. याला कारणच तसे खास आहे कारण पांढरट भुकट रंगाच्या या रेड्याची केशरचना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होत आहे. या ७०० किलो वजनाच्या रेड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की बांगलादेशातील नारायणगंज येथील एका गोठ्यात एक रेडा जगभर चर्चेचा विषय बनला आहे. या रेड्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी फार्मवर लोकांची प्रचंड गर्दी होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प असे नाव का पडले?
हा रेडा दुर्मिळ अल्बिनो प्रजातीचा असून त्याचे वजन तब्बल ७०० किलो आहे. त्याच्या शरीराचा रंग फिकट असून सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेले फिकट सोनेरी रंगाचे केस आहेत. या केसांची रचना हुबेहूब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेअरस्टाईलसारखी दिसते. याचे अनेक लोकांना आर्श्चय वाटत आहे. कोणीतरी या रेड्याचा फोटो सोशल मिडीयावर टाकला होता. तेव्हा अनेकांना हा रेडा व ट्रम्प् यांच्यातील साधर्म्य दिसून आले. तेव्हापासून जगभरातील सोशल मिडीयावर याची चर्चा सुरु झाली.
याबाबात या फार्मचे मालक जिया उद्दीन यांनी सांगितले की, १० महिन्यांपूर्वी त्यांनी हा रेडा राजशाही येथील बाजारातून आणला होता. त्याच्या डोक्यावरील केसांची ठेवण पाहून लहान भावाने गमतीने त्याचे नाव 'डोनाल्ड ट्रम्प' ठेवले. सोशल मीडियावर याचे फोटो आल्यानंतर तो रातोरात स्टार बनला.
जेनेटिक बदल केलेला रेडा
काही तज्ञांच्या मते या रेड्यामध्ये जेनटेकली बदल केले आहेत. कारण अशा प्रकारे रेड्यांना केस आणन्यासाठी व रंग भुरा होण्यासाठी हा बदल केला जातो. बांगलादेशात अशा रेड्यांना मागणी असते त्यामुळे काही जण असा जेनेटिक बदल करतात असे तज्ञ म्हणतात.
बांगलादेशात ईदच्या काळात अशा दुर्मिळ आणि अवाढव्य प्राण्यांना मोठी मागणी असते. सोशल मीडिया स्टार बनलेला हा 'डोनाल्ड ट्रम्प' रेडा ईदपूर्वीच विकला गेला असून, ५५० टका प्रति किलो (बांगलादेशी चलन) या दराने त्याची खरेदी करण्यात आली आहे.