Balochistan Women Unit KAAD pudhari
आंतरराष्ट्रीय

Balochistan Women Unit KAAD: पाकिस्तानी आर्मीवर बलोच महिला आघाडी पडली भारी... ७ जवानांना पाठवलं थेट यमसदनी

Anirudha Sankpal

Balochistan Women Unit KAAD: बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट अर्थात बीएलएफने एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे की त्यांच्या पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या लष्करी युनिट करिमा आर्म्ड असॉल्ट डिव्हीजन अर्थात KAAD आणि कुरबान युनिटने मिळून २८ ऑक्टोबरला बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यातील बुलेदा भागात पाकिस्तानी सुरक्षा दलांविरूद्ध करावाई केली होती.

लष्करी कॅम्पवर हल्ला

दावा केला जात आहे की मैनाज बाजार येथे दोन्हीकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. वाहनांची तपासणी सुरू होती. त्याचवेळी आलंदूर येथील लष्करी कॅम्पवर मोठ्या प्रमाणात अॅटोमेटिक शस्त्रांनी हल्ला केला गेला. संघटनेचा दावा आहे की या हल्ल्यात एकूण ७ पाकिस्तानी जवान मरण पावले.

दावा एकतर्फी

हा दावा प्रामुख्याने बीएलएफने आपल्या वक्तव्याद्वारे आणि माध्यमातील स्त्रोतांच्या आधारे केला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून याबाबतची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा दावा सध्या तरी एकतर्फी मानला जात आहे.

एक महिला शहीद

बुलेदा क्षेत्रात बलुचिस्तानच्या दक्षिण भागात आहे. तिथं बंडखोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. बीएलएफ प्रवक्ता मेजर गवाहराम बलोच यांनी केलेल्या वक्तव्यानुसार KAAD आणि कुरबान युनिटच्या योद्ध्यांनी मैनाजमध्ये नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी केली. तसेच आलंदूर कँपवर रॉकेट आणि ग्रेनेडने हल्ला केला.

यामुळे लष्करी तळाचे खोलवर नुकसान झाले. लष्कराकडून इथं मदत पोहचवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर देखील हल्ला केला गेला. त्यात लष्कराची मनुष्यहानी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक फायटर हाशुम उर्फ नूर बलोच शहीद झाल्याचं सांगण्यात आलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT