Balochistan Attack pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Balochistan Attack: बलूचिस्तानमध्ये बंडखोर BLA चा एकाचवेळी तब्बल १२ शहरांवर हल्ला; पाकिस्तानी सैन्य पोस्ट सोडून गेलं पळून

Anirudha Sankpal

Balochistan BLA Attack12 Cities: पाकिस्तानातील बलूचिस्तानमध्ये बंडखोरांनी मोठा धमाका केला आहे. बलोच लिब्रेशन आर्मीने बलूचिस्तान प्रांतातील अनेक शहरात एकाचवेळी हल्ला केला. त्यांनी हल्ला करून पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयांवर कब्जा केला आहे. शनिवारी बलूचिस्तानमधील बलोच बंडखोर यात बलोड लिबरेशन आर्मीच्या जेयबंद गटाचा प्रामुख्याने समावेश होता त्यांनी ऑपरेशन हेरॉफ फेज २ लाँच केलं.

त्यांनी अनेक पोलीस ठाणी आपल्या ताब्यात घेतली. बलोच बंडखोरांच्या या अचानक केल्या गेलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर आलं. ते पोस्ट सोडून पळून गेले. पाकिस्तानच्या जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या हल्ल्यात १० सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानी सरकारने दावा केला आहे की त्यांनी ५८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

बंडखोरांचे हे हल्ले पाकिस्तानी सुरक्षा दल आणि सरकारी सुविधांना टार्गेट करणारं होतं. हा हल्ला मोठा मानला जात आहे. कारण १२ पेक्षा जास्त ठिकाणी हा हल्ले केल्याचे वृत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंडखोरांनी शनिवारी सकाळी राजधानी क्वेटा मध्ये ६ वाजता हल्ले केले. हा हल्ला मोठ्या धमाक्यानंतर सुरू झाला. त्यानंतर दोन तास जोरदार गोळीबारी झाली अन् अनेक धमाके झाले.

बलोच बंडखोरांनी क्वेटा सोबतच पसनी, मस्तंग, नुश्की आणि ग्वादर जिल्ह्यात एकाचवेळी हल्ले केले. बंडखोरांनी बंदुकीने हल्ला केला तसेत अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले देखील केले.

सोशल मीडियावर देखील स्थानिक पत्रकारांनी अनेक दावे केले आहेत. एका पत्रकाराने बलूचिस्तानमधील अनेक शहरांमध्ये शसस्त्र लोकांनी अनेक शहरात कब्जा केला. मस्तुंग बंडखोरांनी पोलीस स्टेशन आणि शहरावर कब्जा केला. त्यानंतर तुरूंगातील ३० कैदी फरार झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT