Balochistan Liberation Army on Pakistan Army
इस्लामाबाद : बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे. गेल्या २४ तासांत बलुचांनी पाकिस्तानी सैन्यावर केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे, ज्यामध्ये ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा हल्ला बोलानमधील माचकुंड येथे करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. रिमोट वापरून पाकिस्तानी सैन्याचे वाहन उडवून देण्यात आले. यामध्ये पाकिस्तानी एक अधिकाऱ्यासह ७ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याआधीही बीएलएने (BLA) पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला, जिथे पाकिस्तानी सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यात आले. बलुचिस्तानबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी म्हणाले की, बलुचिस्तान हा जंगली घोड्यासारखा आहे, ज्यावर आता पाकिस्तानचे नियंत्रण नाही आणि रात्री तो अधिक जंगली होतो.