वॉशिंग्टन : मूळ भारतीय उद्योजक बैजू प्रफुलकुमार भट्ट यांनी फोर्ब्सच्या 400 सर्वांत श्रीमंत अमेरिकन व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेतील दहा सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. 6.9 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 57,000 कोटी रुपये) संपत्तीसह भट्ट हे या श्रेणीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय वंशाचे संस्थापक ठरले आहेत.
2013 मध्ये भट्ट यांनी कॉलेजमधील मित्र व्लाद टेनेव यांच्यासोबत मिळून ‘रॉबिनहूड’ या फिनटेक स्टार्टअपची स्थापना केली. या कंपनीने कमिशनमुक्त स्टॉक ट्रेडिंगची सुविधा देऊन पारंपरिक ब्रोकरेज कंपन्यांना मोठे आव्हान दिले. यामुळे तरुण आणि पहिल्यांदा गुंतवणूक करणार्यांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक सोपी झाली.
गुजराती स्थलांतरित पालकांचे पुत्र असलेल्या भट्ट यांचे बालपण अलाबामा आणि नंतर व्हर्जिनियामध्ये गेले. त्यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांचे कुटुंब भारतात प्रवास करू शकले नाही आणि 1997 नंतर ते भारतात आलेले नाहीत.