पुढारी ऑनलाईन डेस्क
बुल्गारियाचे भविष्य वक्ते बाबा वेंगा (Baba vanga Predictions 2021) यांनी जगाला चिंतेत टाकणारी भविष्यवाणी केली आहे. त्यांना बाल्कनचा नास्त्रेदमस असेही म्हटले जाते. बाबा वेंगा यांनी अशा काही ऐतिहासिक घटनांची भविष्यवाणी केली होती, जी पुढे जाऊन सत्यात उतरली होती. १९११ मध्ये जन्मलेले वेंगा हे १२ वर्षांचे असताना त्यांची दृष्टी गेली.
बाबा वेंगा यांचे निधन १९६६ मध्ये झाले. मात्र मृत्यू पूर्वी त्यांनी सोविएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील ९/११ (२००१) दहशतवादी हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू (१९९७), चेर्नोबिलची आपत्ती आणि जपान सुनामी (२००४) यासारख्या ऐतिहासिक घटनांची भविष्यवाणी त्यांनी केली होती. असे म्हटले जाते की, बाबा वेंगा यांच्या जवळपास ८५ टक्के भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाणीत ५०६९ पर्यंतचा उल्लेख मिळतो, ज्या वर्षी जगाचा अंत होणार आहे.
आकाशातून आपत्ती येणार…
भविष्यवाणीनुसार २०२१ मध्ये रशियाच्या आसपासच्या भागात उल्का पडतील. यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्तीनेच जग विनाशाकडे वाटचाल करणार नाही तर, युरोपात रासायनिक हल्ले होण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बाबा वेंगा यांनी दावा केला आहे की, या दरम्यान युरोपीय खंडाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या टप्प्यात पोहोचू शकते.
व्लादिमीर पुतीन यांची हत्या…
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी नुसार २०२१ मध्ये युरोप वाईट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट रचला जाईल. देशातच त्यांच्या जीवाला असलेला धोका अधिक वाढेल.
ट्रम्प यांचे आजारपण…
बाबा वेगा यांच्या भविष्यवाणी नुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक भयंकर आजारपण येईल. हा आजार त्यांना बेहरा करून टाकेल. ते ब्रेन ट्रॉमाचे शिकारही होऊ शकतात. पूर्ण जग प्रलयकारी समस्यांनी भरून जाईल. हा काळ लोकांसाठी अडचणींनी भरलेला असेल. लोक जातीच्या नावावर एकमेकांपासून दुरावले जातील. सद्य परिस्थिती पाहता, मानवतेला धक्का पोहोचणाऱ्या अनेक विनाशकारी घटनांचे आपण साक्षीदार आहोत.
ब्रम्हांडात जीवनाचा शोध…
ब्रम्हांडात जीवनाचा शोध घेतला जाईल. यामध्ये हे स्पष्ट होईल की, पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले. आकाशात रेल्वे चालतील…
सुर्याच्या प्रकाशाचा वापर करून रेल्वे आकाशात चालवल्या जातील. पेट्रोलचे उत्पादन बंद केले जाईल. हे पाहता आतापासूनच लोकांमध्ये सौर शक्तीबद्दल आतापासूनच चर्चा वाढत आहेत. त्यामुळे त्यांची ही भविष्यवाणी तितकी प्रभावी किंवा उपयुक्त वाटत नाही.
चीनचा जगावर कब्जा…
एका विशाल ड्रॅगनचा जगातील मानवतेवर कब्जा करेल. तीन दिग्गज एकत्र येतील. काही लोकांकडे रेड करन्सी असेल. वांगा यांनी १०० आणि ५ च्या पुढे अनेक झीरो असण्याची भविष्यवाणी केली होती. विश्लषकांच्या मते तो विशालकाय ड्रगन चीन आहे. जो जगातील एक सुपर पॉवर म्हणून उदयाला येत आहे. तीन दिग्गज एकत्र येणार म्हणजे रशिया, भारत आणि चीन हे देश आहेत. १०० युआर आणि ५००० रूबल नोटा या लाल रंगाच्या असतात.
कॅन्सरवर औषध…
२१ व्या शतकाच्या सुरूवातीला मानव जातीला कॅन्सर पासून सुटका मिळेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी नुसार कॅन्सर सारखा भयानक आजार लोखंडाच्या साखळदंडात बांधला जाईल.