cockroach janata party भारतात आज काल कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची हवा सुरु आहे. जंतर मंतरवर या पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी व अनेक युवकांनी ६ जून रोजी आंदोलन केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील एका घटनेने लक्ष वेधून घेतले आहे. या घटनेत विदेशी प्रजातीची अनेक कॉकरोचेस जप्त करण्यात आली आहेत. ही झुरळे विदेशातून बेकायदेशीर रित्या तस्करी करुन आणली गेली होती. यांमध्ये दुबिया कॉकरोच, मादागास्कर कॉकरोच यांचा समोवश आहे. काही झुरळे माणसाच्या हाताएवढी मोठी आहेत.
कोट्यावधीची किंमत व संख्या ही लाखांवर
ऑस्ट्रेलियातील अधिकार यांनी न्यू साउथ वेल्स (New South Wales) प्रांतातील बाथर्स्ट (Bathurst) या ग्रामीण भागात छापा टाकला यामध्ये १ लाखांच्या वर झुरळे जप्त केली यांची किंमत २ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास दीड कोटी भारतीय रुपये आहेत. ही झुरळे पाळणे कायद्याने बंदी आहे.
याबाबात सविस्तर माहिती अशी की ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स (New South Wales) प्रांतातील बाथर्स्ट (Bathurst) या ग्रामीण भागात वन्यजीव आणि पर्यावरण विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. एका व्यावसायिक पैदास करणाऱ्या कडून तब्बल १ लाखाहून अधिक विदेशी जातीची झुरळे जप्त करण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील ही अवैध कीटकांची सर्वात मोठी जप्ती मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या झुरळांची किंमत तब्बल २ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे १ कोटी ६६ लाख रुपये) इतकी आहे
दोन परदेशी प्रजातींची झुरळे
यामध्ये मादागास्कर हिंसिंग कॉकरोच हे जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या झुरळांपैकी एक आहेत. त्यांचा आकार माणसाच्या हाताच्या तळव्याएवढा किंवा बोटापेक्षा मोठा (५ ते ८ सेंटीमीटर) असतो. धोक्याची जाणीव झाल्यावर हे कीटक सापासारखा 'फूत्कार' (Hissing) आवाज काढतात. तर दुसरी प्रजाती म्हणजे दुबिया कॉकरोच (Dubia Cockroach): ही मूळची दक्षिण अमेरिकेतील प्रजाती असून ती वेगाने अंडी घालण्यासाठी प्रसिद्ध आहे.
१ लाखांच्यावर झुरळांची संख्या
अधिकाऱ्यांनी जेव्हा घरावर छापा टाकला तेव्हा प्लास्टिकच्या शेकडो डब्यांमध्ये १ लाख झुरळे लपवून ठेवल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी छापा टाकला तेंव्हा ३ हजारांच्यावर हे डबे आढळून आले
झुरळांचा काय उपयोग केला जातो?
सरपटणाऱ्या प्राण्यांचे अन्न : ऑस्ट्रेलियामध्ये सरडे (Lizards), साप आणि इतर विदेशी सरपटणारे प्राणी पाळण्याची मोठी क्रेझ आहे. हे परदेशी झुरळे आकाराने मोठे आणि अत्यंत पौष्टिक असतात. सामान्य झुरळांपेक्षा हे मोठे असल्याने पाळलेल्या प्राण्यांना कमी संख्येत जास्त अन्न मिळते. त्यामुळे त्यांची मागणी बाजारात मोठी आहे. तसेच 'मादागास्कर हिंसिंग' झुरळांना अनेक देशांमध्ये पाळीव प्राणी म्हणून हौसेने पाळले जाते, कारण ते चावत नाहीत आणि त्यांचा आवाज युनिक असतो.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी बंदी
ऑस्ट्रेलियामध्ये या प्रजातींच्या आयातीवर आणि ब्रीडिंगवर पूर्णपणे बंदी आहे. तरीही जास्त नफा कमावण्यासाठी लोक छुप्या मार्गाने त्यांची तस्करी करतात ऑस्ट्रेलियाचे पर्यावरण कायदे जगात सर्वात कडक आहेत. जर ही परदेशी झुरळे चुकून जंगलात किंवा शहरात सुटली, तर तेथील स्थानिक कीटक, शेती आणि जैवविविधतेचे अतोनात नुकसान करू शकतात. आता जप्त केलेली झुरळे वन्यजीव अधिकारी योग्य पद्धतीने नष्ट करणार आहेत.