कोलोराडा : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेतील अटलांटामधील मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच कोलोराडोतील बोल्डर शहरातील सूपर मार्केटमध्ये सोमवारी अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एका पोलिस अधिकार्यासह १० जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरही जखमी झाला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
वाचा : वाझेंचा फोटो असलेले गावडे नावाचे आधारकार्ड
कोलोराडामधील बोल्डर येथील किंग सूपर मार्केटमध्ये दुपारी हल्लेखोर आला. त्याने अंदाधूंद गोळीबार केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. गोळीबार सुरु होताच स्टोअरमधील ग्राहक जमिनीवर झोपले. तर काही जणांनी स्टोअरमधून बाहेर पलायनाचा प्रयत्न केला. गोळीबारात यामध्ये एका पोलीस अधिकार्यासह १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह सुरक्षा संस्थांच्या अधिकार्यांनी धाव घेतली. हल्लेखोरही गंभीर जखमी झाला, अशी माहिती बोल्डरचे पोलीस प्रमुखांनी दिली.
वाचा : कोरोनाच्या एंट्रीला आज वर्ष; दुसरी लाटही उंबरठ्यावर
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस हल्लेखोरास घेवून जाताना दिसत आहेत. तर सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेली नाही. याचा तपास सुरु आहे. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आल्याचे बोल्डरचे पोलीस प्रमुखकमांडर केरी यामाकुशी यांनी सांगितले. पोलिसांनी धडक कारवाई केल्याने मोठी जिवितहानी टळली असेही ते म्हणाले. मागील आठवड्यात जॉर्जिया राज्यात दोन मसाज पार्लरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले होते. मृतांमध्ये सहा आशियाई महिलांचा समावेश होता.