Asim Munir China visit | लष्करप्रमुख मुनीर यांचा चीनकडून पाणउतारा Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Asim Munir China visit | लष्करप्रमुख मुनीर यांचा चीनकडून पाणउतारा

बीजिंग दौर्‍यावेळी सुरक्षेच्या मुद्द्यावरून खडसावले

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग; वृत्तसंस्था : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या चीन दौर्‍यात चीनने कठोर भूमिका घेतली. परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तानातील चिनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरून चिंता व्यक्त करत खडसावले. ही घटना चीन-पाक संबंधांतील वाढत्या दरीचे संकेत देत आहे.

आता पाकिस्तानवर चीनचाही विश्वास उरलेला नाही, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत, जिथे त्यांना सर्वांसमोर मानहानीला सामोरे जावे लागले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तानमधील चिनी कर्मचारी, प्रकल्प आणि संस्थांच्या सुरक्षेवरून त्यांना चांगलेच फटकारले आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक चिनी नागरिक मारले गेले आहेत. यावरून चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीत मुनीर चीनच्या प्रश्नांना ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांनी केवळ चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री खडकासारखी मजबूत आहे, असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच, पाकिस्तानी लष्कर चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

पाकिस्तानची बिकट अवस्था

भारतासोबत तणाव वाढल्यानंतर मुनीर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तान आर्थिकद़ृष्ट्या पूर्णपणे कंगाल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT