आंतरराष्ट्रीय

‘मिस श्रीलंका न्यूयॉर्क’ सौंदर्य स्पर्धेदरम्यान 14 सौंदर्यवती एकमेकींसोबत भिडल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा ‍‍‍व्हिडिओ व्हायरल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बुद्धिमत्ता, एलिगन्स आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेली स्पर्धा म्हणून सौंदर्य स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेदरम्यान सौंदर्याची उधळण होणं अपेक्षित असताना न्यूयॉर्कमध्ये मात्र वेगळाच प्रकार घडला आहे. न्यूयॉर्क येथे स्थायिक झालेल्या श्रीलंकन नागरिकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा पार पडली पण यानंतरच्या आफ्टर पार्टीमध्ये मात्र बराच राडा झाला. सौंदर्यवतीचा किताब कुणाचा यावरून झालेल्या मारहाणीत जवळपास 14 सौंदर्यवती एकमेकींसोबत भिडल्या.

त्यातील एकीला पोलिसांनी अटक केली. प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावरून मुकुट हिसकावल्याने या हाणामारीला सुरुवात झाल्याचं समोर आलं. विजेता घटस्फोटीत असल्याने या स्पर्धेसाठी पात्र नसल्याचं अटक केलेल्या स्पर्धकांच म्हणणं होतं. हा व्हीडियो व्हायरल होताच अनेक श्रीलंकन नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकाने हे तर खेड्यांतून आलेल्या नागरिकांसारखं वर्तन असल्याचं म्हणत टीका केली आहे. तर ' हे युनायटेड स्टेटमध्ये जाऊन श्रीलंकेच नाव खराब करत असल्याचं अनेकांच मत आहे. तर एका युजरने हे कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट श्रीलंकन खेडूतांमध्ये होत असते अशाप्रकारच्या मारहाणीने झाला असल्याचं म्हटलं आहे.

SCROLL FOR NEXT