आंतरराष्ट्रीय

Apple कडून google ला झटका देण्याची तयारी सुरु!

Pudhari News

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

गेल्या काही वर्षांपासून Apple ही बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी स्वतःच्या सर्च इंजिनवर काम करत आहे. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार या वृत्ताला आता दुजोरा देण्यात आला आहे. Apple गुगलवरील आरोप लक्षात घेऊन हे पाऊल उचलत आहे. वास्तविक, सर्च इंजिनच्या दुरुपयोगाबद्दल दिग्गज टेक कंपनी गुगलची चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत Google ला आपली भागीदारी संपुष्टात आणावी लागण्याची शक्यता आहे. 

अहवालानुसार Apple ने सर्च इंजिनच्या विकासाशी संबंधित लोकांना कामावर ठेवले आहे. त्यातील काही गूगलचे माजी कर्मचारीही आहेत. याव्यतिरिक्त, Apple या संदर्भात काही नवीन भरती देखील करीत आहे. फायनान्शियल टाईम्सला Applebot संबंधित माहिती मिळाली आहे. हा एक वेब क्रॉलर आहे जो मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा संकलित करतो. अलीकडे Apple ने आयफोन युझर्ससाठी सर्च करण्यामध्येही काही बदल केले आहेत. आता वेब सर्च दरम्यान, प्रारंभिक रिझल्ट Appele कडून येतो, पण गूगलकडून नाही. तथापि, हे केवळ iOS 14 मध्ये घडत आहे.

Apple आपले सर्च इंजिन किती काळात लाँच करेल हे अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, जेव्हा येईल तेव्हा थेट स्पर्धा Google शी राहील. जगभरात सुमारे 90 टक्के लोक ऑनलाइन शोधासाठी गुगल वापरतात. इतर बर्‍याच कंपन्यांनी गुगल सर्चशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळालेले नाही. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT