डोनाल्‍ड ट्रम्‍प.  File Photo
आंतरराष्ट्रीय

पराकोटीचा 'ट्रम्‍प' व्देष..! निवडणूक जिंकल्‍यानंतर विरोधकाने कुटुंबासोबत केले ते भयंकरच

अमेरिकेतील मिनेसोटात प्रचंड खळबळ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील महासत्ता असे बिरुद मिरवणार्‍या या देशाच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी डोनाल्‍ड ट्रम्‍प (Donald Trump) विरुद्‍ध कमला हॅरिस यांच्‍यातील चुरशीची लढत होईल, असे अपेक्षित होते;पण निवडणूक निकाला ट्रम्‍प यांनी बाजी मारली. त्‍यांच्‍या विजयावर अमेरिकेसह विविध देशातून सरकारात्‍मक तसेच नकारात्‍मक प्रतिक्रियाही उमटत आहे. मात्र ट्रम्‍प यांच्‍या विजयाने अमेरिकेतील मिनेसोटा शहरात एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

कुटुंबातील चौघांची हत्‍या करत स्‍वत: जीवन संपवले

'एएफ'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, अमेरिकेतील मिनेसोटा येथील डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियावर सतत पोस्ट करणाऱ्या अँथनी नेफ्यू याने कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केली. यानंतर स्‍वत:चेही जीवन संपवले. त्याने आपल्या कुटुंबातील चार जणांना गोळ्या घालून ठार केले. हे प्रकरण 7 नोव्हेंबर रोजी उघडकीस आले. जेव्हा येथील घरातून मृतदेह सापडले.

पोलिसांनी घरातूनच अँथनीचा मृतदेहही ताब्यात

स्‍थानिक पोलिसांनी म्‍हटले आहे की, आएरिन अब्रामसन आणि तिचा मुलगा जेकब यांचे मृतदेह सापडले . याशिवाय शेजारच्या दुसऱ्या अपार्टमेंटमधून पत्नी कॅथरीन नेफ्यू आणि त्याचा मुलगा ऑलिव्हर नेफ्यू यांचे मृतदेह सापडले आहेत. यानंतर पोलिसांना घरातच ४६ वर्षीय अँथनी नेफ्यू याचाही मृतदेहही मिळाला. त्याने स्‍वत:वर गोळी झाडून घेतल्‍याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस प्रमुख माईक सेनोव्हा यांनी सांगितले की, कुटुंबाचा खून करून आत्महत्या करणारा अँटोनी याने सोशल मीडियावर लागोपाठ अनेक पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प विरोधी विचार मांडले होते.

धार्मिक कट्टरवादाची मला भीती वाटते

जुलैमध्ये त्‍याने केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं होतं की, माझे मानसिक आरोग्य आणि जग एकत्र शांतीत राहू शकत नाही. याचे कारण धर्म आहे. माझ्या कुटुंबावर लादल्या जात असलेल्या धार्मिक कट्टरवादाची मला भीती वाटते. सत्य बोलल्याबद्दल मला सुळावर चढवायला आवडे. खरे तर लोकांना वाटते की मी आणि माझी मुले ख्रिस्तविरोधी आहेत. एका पोस्टमध्ये त्‍याने रिपब्लिकन पक्षावर लिहिलं होतं की, या लोकांनी महिलांसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यांना अशा नात्यातून बाहेर पडता येत नाही जिथे त्यांना छळाचा सामना करावा लागतो. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्‍याने बराक ओबामा, ट्रम्प, जो बिडेन आणि कमला हॅरिस यांचे फोटो शेअर केले होते. यासोबतच त्यांनी ट्रम्प यांच्या चित्रासोबत हेट हा शब्द लिहिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT