म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्‍या विनाशकारी भूकंपात शेकडाे इमारती उद्ध्वस्त झाल्‍या आहेत. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

म्यानमारला पुन्‍हा बसला ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Myanmar Earthquake : भूकंपबळींची संख्‍या एक हजारांहून अधिक, मदतकार्य युद्धतापळीवर सुरु

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन: Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये शुक्रवारी (दि.२८) ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपानंतर आज (दि.२९) पुन्‍हा एकदा भूकंपाचे धक्‍के जाणवले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी मोजण्यात आली आहे. त्याचे केंद्र राजधानी नायपिडॉजवळ असल्याचे सांगितले जात आहे. दरम्‍यान, स्थानिक माध्यमांनुसार शुक्रवारी झालेल्‍या भूकंपात आतापर्यंत १००२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १६७० लोक जखमी झाले आहेत. भूकंपातील मृतांचा आकडा १०,००० पेक्षा जास्त होऊ शकतो, अशी भीतीही यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने व्‍यक्‍त केली आहे.

शुक्रवारी म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेच्या विनाशकारी भूकंप झाला. शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता आणि इमारती, बौद्ध स्तूप, रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतरही देशात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज झालेल्‍या आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी प्रशासन सतर्क झाले आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज दुपारी २:५० वाजता (भारतीय वेळेनुसार) म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, शुक्रवारी रात्री ११:५६ वाजता (स्थानिक वेळेनुसार) म्यानमारमध्ये ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला.

शनिवारी पहाटे ५:१६ वाजता अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीपासून १८० किमी खोलीवर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी होती. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर हा भूकंपाचा धक्‍का जाणवल्‍याने नागरिकांमध्‍ये दहशत कायम आहे.

today

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT