पुढारी ऑनलाईन डेस्क
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याला अमेरिका येथून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील कॅलीफोर्निया येथे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकन पोलीस आणि एजन्सी च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
अनमोल बिष्णोई अमेरिकेत लपून बसला होता. त्याच्याविरोधात इंटरपोल ची नोटीस बजावण्यात आली होती. इंटरपोलच्या नोटीसनंतर अमेरिकन पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या आणि एजेंसीच्या मदतीने ही कारवाई केली. अनमोल बिष्णोई याला भारतात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकन पोलिसांकडे अर्ज केला आहे. सलमान खान घरावरील हल्ला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिष्णोई गँग चा सहभाग होता. या दोन्ही प्रकरणात अनमोल बिष्णोई याने सुपारी दिली होती. लॉरेन्सचे नेटवर्क परदेशातून चालवण्यात अनमोल याचा मोठा सहभाग होता.