Andy Burnham | बर्नहॅम यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; ब्रिटनमध्ये १० वर्षांत सातवे पंतप्रधान 
आंतरराष्ट्रीय

Andy Burnham | बर्नहॅम यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ; ब्रिटनमध्ये १० वर्षांत सातवे पंतप्रधान

पाकिस्तानी मुळाच्या महमूद अर्थमंत्रिपदी?

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनमध्ये सोमवारी अँडी बर्नहॅम यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. माजी पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर बर्नहॅम यांनी किंग चार्ल्स यांची भेट घेत औपचारिकपणे पदभार स्वीकारला. गेल्या दहा वर्षांत ब्रिटनला मिळालेले ते सातवे पंतप्रधान ठरले आहेत.

ग्रेटर मँचेस्टरचे माजी महापौर असलेले ५६ वर्षीय बर्नहॅम यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर देशातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याचे संकेत दिले. महागाई, कमकुवत सार्वजनिक सेवा आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे हे त्यांच्या सरकारचे प्रमुख प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान बर्नहॅम यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान म्हणजे नव्या मंत्रिमंडळाची निवड करणे हे आहे. विशेषतः अर्थमंत्रिपदासाठी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऊर्जा सुरक्षा मंत्री एड मिलिबँड यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र आता पाकिस्तानी मुळाच्या गृहमंत्री शबाना महमूद यांचे नाव अर्थमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. महमूद या मजूर पक्षातील प्रभावशाली नेत्या असून स्टार्मर यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. बर्नहॅम सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत सर्व कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र लागू करण्याची योजना रद्द केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT