आंतरराष्ट्रीय

उलट्या होत असल्याने डॉक्टरांकडे गेला अन्…

Arun Patil

सिंगापूर : एखाद्याच्या पोटात ऑक्टोपस अडकल्याचे कोणी सांगितले, तर त्यावर कोणीच सहजी विश्वास ठेवणार नाही. वास्तवात अशी घटना घडली आहे. उलट्या होत असल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला आणि त्यामागचे कारण समोर आल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण, या रुग्णाच्या घशात चक्क ऑक्टोपस अडकल्याचे दिसून आले. 'द न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, संबंधित रुग्णाला जेवणानंतर उलट्या होऊ लागल्या. त्याला अन्न गिळतानाही वेदना होऊ लागल्या. यानंतर त्याने रुग्णालयात धाव घेतली.

टॅन टॉक सेंग हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांनी 55 वर्षीय व्यक्तीची तपासणी केली आणि सीटी स्कॅनमध्ये असे दिसून आले की, त्याच्या अन्ननलिकेत ऑक्टोपस अडकला आहे. हा ऑक्टोपसला काढून टाकण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑक्टोपसच्या पोटात एन्डोस्कोप काळजीपूर्वक नेव्हिगेट केले. त्याचे डोके पकडण्यासाठी आणि ते काढण्यासाठी आणखी एका आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला. हे प्रयत्न अखेर यशस्वी झाले. पाठोपाठ रुग्णाला दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT