न्यू जर्सी (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे बुधवार (ता. ११) झालेल्या गोळीबारात पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार झाले आहेत. गोळीबाराची घटना शहरातील बायव्ह्यू परिसरात घडली आहे. हा हल्ला एका स्टोअरच्या बाहेर घडल्याचे समजते. बायव्ह्यू आणि मार्टिन ल्यूथर किंग रोडजवळ झालेल्या गोळीबारानंतर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या भागातील शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
यानंतर स्वॉट पोलिसांची आपत्कालीन तूकडी घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. गोळीबारात एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. तर येथे दोन संशयित हल्लेखोरांना मारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.