पुढारी ऑनलाईन डेस्क:
जगातील श्रीमंतांच्या यादीत जेफ बोजेस हे पुन्हा दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. गेल्या काही दिवासत ॲमेझॉनच्या शेअर्समध्ये वाढ होत असल्याने त्यांनी दूसरे स्थान पटकावले आहे. शेअर्स मध्ये वाढ झाल्यावर त्यांनी ३ बिलीअन डॉलर्सच्या किंमतीचे शेअर्स विकले आहेत. यावर्षी त्यांनी एकूण १३ बिलीयन डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत. ब्लुमबर्ग बिलिनेयर्सनुसार त्यांची एकूण संपत्ती आता २२२ बिलीयन डॉलर्सवर पोहचली आहे.या संबधी वृत्त हिंदूस्थान टाईमने दिले आहे.
सध्या अमेझॉनच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. २०० डॉलर प्रति शेअर इतकी ती पोहचली आहे. यावर्षी जुलै महिन्यातसूद्धा शेअर्सची किंमत वाढली होती. त्यावेळी मोठया प्रमाणात बेझोस यांनी समभागांची विक्री केली होती. बेझोस मोठया प्रमाणात शेअर्सची विक्री करत आहेत याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
ब्लुमबर्ग बिलिनेयर्स च्या ताज्या अहवालानुसार २२२ बिलीयन डॉलर इतकी संपत्ती सध्या जेफ बोजेस यांच्याकडे आहे. यावर्षी बोझेस यांच्या संपत्तीत ४२.८ बिलीयन डॉलर्स इतकी वाढ झाली आहे. या यादीत टेस्ला , स्पेस एक्सचे संस्थापक इलॉन मस्क पहिल्या स्थानवर असून त्यांची संपत्ती २४८ बिलीयन डॉलर्स आहे, तर फेसबूकचे मार्क झुकरबर्ग तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती २०६ बिलीयन डॉलर्स इतकी आहे.