Miami Cargo Plane Crash | मियामीत कार्गो विमानाची वाहनांना धडक; ५ मृत्यू 
आंतरराष्ट्रीय

Miami Cargo Plane Crash | मियामीत कार्गो विमानाची वाहनांना धडक; ५ मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मियामी; वृत्तसंस्था : अमेरिकेतील मियामी इंटरनॅशनल एअरपोर्टवर ॲमेझॉन एअर नेटवर्कसाठी कार्यरत बोइंग ७६७ कार्गो विमान लँडिंगनंतर रनवेवरून घसरले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडकले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

हे विमान प्यूर्टो रिकोतील लुइस मुनोज मारिन इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मियामीला आले होते. लँडिंगनंतर विमान थांबण्यापूर्वीच रनवेच्या पुढे गेले. वाहनांना धडकताच विमानाला आग लागली आणि परिसरात काळ्या धुराचे दाट लोट दिसून आले. पायलट आणि को-पायलटही कॉकपिटमध्ये अडकले होते. २०० आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष फोमच्या मदतीने आग आटोक्यात आणून अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. काही काळ विमानातून इंधन गळतीही सुरू होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे मियामी विमानतळावरील १६० हून अधिक उड्डाणे रद्द, तर सुमारे ३२५ उड्डाणांना विलंब झाला.

कार्गो विमान रनवेवरून घसरले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकले, तेव्हा काही लोक त्या वाहनांमध्ये होते, अशी माहिती मियामी येथील अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे. ते म्हणाले की, या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी वैमानिक आणि सह-वैमानिक कॉकपिटमध्ये, तर काही प्रवासी कारमध्ये होते. एका व्यक्तीला वाहनाखाली अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT