सीरियातून पळालेले राष्‍ट्राध्यक्ष असद अफाट संपत्तीचे मालक, २०० टन सोने..महागड्या कारसह  File Photo
आंतरराष्ट्रीय

सीरियातून पळालेले राष्‍ट्राध्यक्ष असद अफाट संपत्तीचे मालक, २०० टन सोने..महागड्या कार अन्

Bashar al-Assad : सरकार उलथून टाकल्‍यावर असद संपत्तीसह पळाले?

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

Bashar al-Assad सीरियातील 13 वर्षांच्या गृहयुद्धात बंडखोरांसमोर शरणागती पत्करणारे बशर अल-असद आपल्या देशातून पळून गेले आहेत. असद आणि त्याच्या कुटुंबाकडे अफाट संपत्ती आहे, ज्यात शेकडो टन सोन्याचाही समावेश आहे.

बशर अल-असद यांचा सीरियात इस्लामिक बंडखोरांनी पराभव केला आहे आणि त्यांना केवळ त्यांचे राज्यच नाही तर देशही सोडण्यास भाग पाडले आहे. 13 वर्षांच्या गृहयुद्धानंतर, बंडखोर इस्लामिक गट हयात तहरीर अल शाम (एचटीएस) च्या नेतृत्वाखाली असाद सरकार अखेर उलथून टाकण्यात आले.

युद्धाच्या दरम्‍यान राष्ट्राध्यक्षपदावरून हटवलेले बशर अल-असद आपल्या काफिल्यासह निघून गेले आणि आता ते रशियात आहेत. देश सोडून पळून गेलेला असाद हे अफाट संपत्तीचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे शेकडो टन सोने तसेच अमेरिकन डॉलर आणि युरोचा मोठा साठा आहे. बशर अल-असद यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...

2011 मध्ये गृहयुद्ध सुरू, 13 वर्षांनी सत्तापालट

सीरिया गृहयुद्धादरम्‍यान बशल अल-असद यांच्या देश सोडण्याची जेंव्हा चर्चा सुरू झाली तेंव्हा माहिती समोर आली की, असद यांच्या विमानाने सीरियाच्या लताकियाहून उड्डाण भरून मॉस्‍कोला पोहोचले. फ्लाईट रडार बेबसाईटच्या आकडेवारीनुसार, रविवार (८ डिसेंबर) दिवशी एक रशियन विमान लताकियाहून उड्डान करून मॉस्‍को पोहोचले होते. त्‍यावरून असे अनुमान काढण्यात आले होते की, ते विमान असद यांच्यासाठीच आले होते.

सीरियामध्ये २०११ पासून बंडखोरीला सुरूवात झाली होती. सरकारने लोकशाही समर्थक निदर्शने क्रूरपणे चिरडली होती. या ठिकाणी संघर्ष हा हळू-हळू गृहयुद्धात रूपांतरीत झाला. ज्‍यामध्ये असद सरकारच्या विरोधात अनेक बंडखोर गट उभे ठाकले. अखेर १३ वर्षांच्या संघर्षानंतर शासन झुकले. बंडखोर गटांनी दमिश्कवर ताबा मिळवला नाही तर असद सरकारला उखडून फेकले, तसेच सीरियाच्या जनतेला नव्याने सुरूवात करण्याची एक संधी मिळाली आहे.

असद यांच्याकडे 200 टन सोन्याचा साठा आहे!

आपला देश सोडून पलायन केलेल्‍या असद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. समोर आलेल्‍या माहितीनुसार, त्‍यांनी देश सोडताना आपल्‍यासोबत कित्‍येक किलो सोने (Gold) आणि मोठी रक्‍कम घेउन गेले आहेत. एका बाजुला देशातील ९० टक्‍के जनता ही गरीबीत खितपत पडली आहे. तर सउदी वृत्तपत्राने दिलेल्‍या माहितीनुसार, राष्‍ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. Elaw च्या अहवालात, ब्रिटिश इंटेलिजेंस सर्व्हिसेस MI6 च्या माहितीचा हवाला देत, असे म्हटले आहे की, गेल्या वर्षी 2023 पर्यंत, राष्ट्रपतींच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे 200 टन सोन्यासह अब्जावधी डॉलर्स आणि युरोचा समावेश होता.

सीरियाच्या 7 वर्षांच्या बजेटइतकी संपत्ती

इलाव यांच्या म्हणण्यानुसार, २०० टन सोन्याच्या साठ्याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष असद यांच्याकडे १६ अब्ज डॉलर्स (सुमारे १.३५ लाख कोटी रुपये) आणि ५ अब्ज युरो (सुमारे ४४,५९४ कोटी रुपये) संपत्ती होती. याशिवाय राष्ट्राध्यक्ष असद यांच्याकडे एक आलिशान घर आणि महागड्या आणि आलिशान गाड्यांचा संग्रह होता, ज्याची झलक त्यांच्या ताफ्यात दररोज पाहायला मिळत होती. त्याच्या ताफ्यात रोल्स रॉयस फँटम, ॲस्टन मार्टिन डीबी7 ते फेरारी एफ40, फेरारी एफ430 आणि मर्सिडीज बेंझ, ऑडी या गाड्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

विशेष बाब म्हणजे सौदी वृत्तपत्र ऐलावच्या अहवालात बसर अल-असद यांची एकूण संपत्ती सुमारे ७ वर्षांच्या सीरियाच्या बजेटइतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, यापैकी किती मालमत्ता किंवा सोने, डॉलर किंवा युरोसह असाद हे देशातून पळून गेले आहेत हे स्पष्ट झालेले नाही.

अमली पदार्थांच्या व्यापारातून कोट्यवधींची कमाई

वृत्तानुसार, बशर अल-असद यांच्याकडे सीरियामध्ये अमली पदार्थांची मोठी संपत्ती होती, ज्यामुळे असद सरकारला अब्जावधी डॉलर्सची कमाई झाली. या औषधाचे नाव 'कॅपटाग्नट' आहे आणि अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, जगातील त्याचे 80% उत्पादन फक्त सीरियामध्ये आहे. सीरिया सर्वात जास्त निर्यात करतो आणि इस्रायली वेबसाइट वायनेटच्या मते, असद सरकार याद्वारे दरवर्षी सुमारे 5 अब्ज डॉलर्स कमवत असे. कॅप्टॅगॉनच्या माध्यमातून केवळ असद कुटुंबीयच नव्हे तर सीरियन लष्करातील उच्च अधिकारीही प्रचंड कमाई करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT