पुढारी ऑनलाईन डेस्क : Afghanistan Earthquake | अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात आज (दि. १६) पहाटे ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दिल्ली-एनसीआर प्रदेशासह भारतातील काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने दिली आहे.
एनसीएस नुसार, भूकंप जमिनीपासून सुमारे ७५ किलोमीटर खोलीवर झाला. ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप हा केंद्राजवळील भागात गंभीर नुकसान करू शकतो. मात्र, सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. भूकंपानंतर सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी भूकंपाच्या अनुभवांची माहिती शेअर केली आहे.